मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


काही वर्षांपूर्वी टीव्हीवर ‘फुलपाखरू’ ही मालिका आली आणि तिने प्रेक्षकांना प्रेम करण्यासाठी एक नवा चेहरा दिला. हा चेहरा म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे होय. बोलके डोळे असणारी ऋता महाराष्ट्राची ‘क्रश’ आहे, असे म्हणणे कदाचित चुकीचे ठरणार नाही. या दिवसांत ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे निरागसतेने भरलेले फोटो नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडतात. नुकतीच अभिनेत्री तिच्या लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

वास्तविक ऋताने नुकताच हेअरकट केला आहे. ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. याठिकाणी तिने एकूण तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तुम्ही तिचा नवीन हेअरकट पाहू शकता. मीडियम शॉर्ट हेअरमध्येही ऋता अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरलही होत आहेत.

नवीन हेअरकटचे फोटो शेअर करत, ऋताने कॅप्शनमध्ये ‘चॉप चॉप’ असं लिहिलं आहे. हा हेअरकट तिला चांगलाच सूट झाल्याचे चाहते कमेंट्सच्या माध्यमातून सांगत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील यावर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे. तिने कमेंट करत लिहिले, “अगं किती क्यूट.” याशिवाय तिने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात ती पार्लरमध्ये बसून नवा हेअरकट फ्लाँट करताना दिसत आहे. (see hruta durgules new hair cut)

ऋताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘दुर्वा’ आणि ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. ती ‘सिंगिंग स्टार’ या रियालिटी शोमध्ये झळकली आहे. शिवाय तिने ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्टफिल्ममध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे आता अभिनेत्री रवी जाधवच्या ‘टाईमपास ३’ मध्ये झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ग्रेसी सिंग; २० वर्षांनंतर अशी दिसतेय आमिर खानची अभिनेत्री

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.