Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘पठाण’ चित्रपटाच्या वादात अर्जुन कपूरची उडी, म्हणाला, ‘सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकारवर…’

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान सध्या पठाण चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. येत्या (दि, 25 जानेवारी) रोजी पठाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणाग आहे. पण बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट वादाच्या घेऱ्यात अडकला आहे. या वादामुळे सर्वत्र गदारोळ पसराल होता, त्यामुळे पठाण चित्रपट सेन्सॉर बोर्डकडे गेला असून चित्रपटामध्ये बदल करण्या सांगितला आहे. या प्रकरणावर अर्जुन कपूर याने भाष्य केलं आहे.

प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त वैयक्तीक आयुष्यामुळे खूपच चर्चेत असतो. त्याशिवाय तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. नुकतंच त्याने एका मुलाखतीदरम्यान पठाण (Pathan) चित्रपटावर त्याचे मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला की, “आपण ज्यावर चर्चा करत आहोत त्याचा नक्की फायदा होईल. आपण सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकार वर विश्वास ठेवायला हवा ते दोघे एकत्र काम करतात. मला वाटते की, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, पण कलाकार म्हणून चित्रपटाला जे हवं आहे ते आपण केलं पाहिजे आणि जे सत्य आहे ते धरून ठेवायला पाहिजे. अवास्तव प्रश्नांमध्ये आपण अडकायला नको.”

अर्जुन पुढे म्हणाला की, “चित्रपटासाठी जे लागेल ते देणं हे आपले काम आहे, त्यानंतर चित्रपट प्रेक्षकांवर सोडायचा, त्यानंतर ते ठरवतील की विरोध करायचा की नाही. मला वाटतंय की, आम्ही बऱ्याच काळापासून याचं पालन केलं आहे. प्रत्येक चित्रपटाला एक प्रक्रिया पाळावी लागते, आमचा चित्रपटही त्याला अपवाद नाही. लोकशाहीमध्ये प्रक्रिया आणि नियमांवर विश्वास ठेवला पाहिजे.”

अर्जुन कपूर सध्या त्याचा आगामी येणारा ‘कुत्ते’ (Kuttey) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमामध्ये जात आहे. अशातच त्याने एक मुलाखतीदरम्यान पठाण चित्रपटवर भाष्य केलं आहे. अर्जुनच्या मते केंद्र सरकार आणि आपल्या मेहनतीवर विश्वास हवा, आपल्याकडून जेवढं चित्रपटाला देऊ शकतो तेवढं द्यायचं आणि मग बाकी प्रेक्षकांवर अवलंबून राहिल. कुत्ते चित्रपटामध्ये त्याच्या सोबत मुख्य भूमिकेत राधिका मदन (Radhika Madan), आणि नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah), तब्बू (Tabbu) देखिल महत्वाच्या भूमिकेत आहे. ‘कुत्ते’हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
गुलाबो! रुपाली जग्गाच्या हॉट लूकने वाढवले सोशल मीडियाचे तापमान
‘माझं स्वतःच ऑफिस आहे आणि तो आजही…’, कंगणाने साधला ऋतिक रोशनवर थेट निशाणा

हे देखील वाचा