Saturday, March 2, 2024

एका पार्टीनंतर ‘असे’ बदलले अर्जुन रामपालचे अवघे आयुष्य, पाहा कसा केला मॉडेल ते अभिनेत्याचा प्रवास

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. त्याने त्याच्या मेहनतीने त्याचे नाव कमावले आहे. अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो जोरदार चर्चेत असतो. अर्जुन रविवारी (26 नोव्हेंबर) त्याचा 50वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी…

अर्जुन रामपालचा जन्म 26 नोव्हेंबर 1972 मध्ये जबलपूर येथे झाला. लहान असताना त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तो लहान होता, तेव्हाच त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याची आई त्याला त्याला तिच्यासोबत नाशिकला घेऊन गेली. त्याची आई एक शिक्षिका होती. त्याचे शालेय शिक्षण तिथेच पूर्ण झाले. नंतर त्याने दिल्लीमधील हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये शिकताना त्याने मॉडेलिंग सुरू केली. यानंतर त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (actor arjun rampal celebrate his birthday , lets know about his life)

एकदा अर्जुन दिल्लीमधील एका पार्टीत गेला होता. परंतु त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती की, या पार्टीनंतर त्यांचे आयुष्य बदलणार आहे. यावेळी फॅशन डिझायनर रोहित बलची नजर अर्जुनावर पडली. त्यांनी अर्जुनला मॉडेलिंग करण्याची ऑफर दिली. त्याने ती ऑफर स्वीकारली. यानंतर त्याने मॉडेलिंगमध्ये त्याचे नाव कमावले.

अर्जुनने एक मॉडेल म्हणून त्याची एक वेगळी ओळख बनवली होती. त्यानंतर 2001 साली त्याला ‘प्यार इश्क मोहब्बत’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. त्याने ‘दीवानापण, ‘दिल है तुम्हारा’, ‘आईसीयू’, ‘असंभव’, ‘यकीन’, ‘रॉय’, ‘दिल का रिश्ता’, ‘चक्रव्यूव्ह’, ‘इन्कार’, ‘डॅडी’, ‘अनकही’, ‘डॉन’, ‘वादा’, ‘ओम शांती ओम’, ‘हाऊसफुल’, ‘रावण’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

अर्जुनने 1998 साली मॉडेल मेहर जेसियासोबत लग्न केले होते. त्या दोघांना दोन मुली आहेत. त्यांची नावे माहिया आणि मायरा ही आहेत. परंतु लग्नाच्या 20 वर्षानंतर 2018 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांना मोठा धक्का बसला होता.

अर्जुन आणि मेहर यांच्या घटस्फोटाचे कारण गैब्रिएला मानले जाते. गैब्रिएला साऊथची एक मॉडेल आहे. तिचे नाव एफ एच एम मध्ये जगातील 100 सेक्सी महिलांच्या यादीत येते. गैब्रिएला आणि अर्जुनला एक मुलगा आहे, परंतु त्या दोघांनी अजून लग्न नाही केले.

हेही वाचा-
‘दगडी चाळ’फेम पूजा सावंतचा हॅट लूक पाहिलात का?
कपडे न घालता कॅमेऱ्याच्या समोर आली उर्फी?, मग लाजून केले ‘हे’ कृत्य; पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा