Tuesday, March 5, 2024

कपडे न घालता कॅमेऱ्याच्या समोर आली उर्फी?, मग लाजून केले ‘हे’ कृत्य; पाहा व्हिडिओ

बॉलिवूड जगतात अशा अनेक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे अतरंगी जीव अभिनेत्री उर्फी जावेदचे. आजपर्यंत उर्फी जावेदच्या (Urfi Javed) अतरंगी कपड्यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. एकापेक्षा एक चित्र- विचित्र ड्रेस घालत उर्फीने सोशल मीडियावर चर्चेत राहण्याचा जोरदार प्रयत्न केला. आता उर्फी तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. सध्या उर्फीचे असेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिने कपडेच घातले नाहीत हे दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या बोल्ड आणि अनोख्या स्टाईलमुळे चर्चेत असते. नुकतेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती चिकटपट्टीने स्वतःला झाकून ठेवलेली दिसत आहे. या व्हिडिओमुळे तिचे अनेक चाहते संतप्त झाले आहेत. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका महिलासोबत दिसत आहे. महिला तिच्या शरीरावर चिकटपट्टी चिकटवत आहे. उर्फी जावेद यावेळी शांतपणे उभी आहे.

व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांचा संतापले आहे. त्यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे. एका चाहत्याने लिहिले, “हे काय चाललंय? उर्फी जावेद आता काय करणार ते सांगता येत नाही.” दुसऱ्याने लिहिले, “मला या उर्फी जावेद हिची किव येते.” उर्फी जावेदने यापूर्वीही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वाद निर्माण केले आहेत. तिला अनेकदा जीवे मारण्याची धमकीही मिळाली आहे. मात्र, या सर्व गोष्टींचा तिला काहीही फरक पडत नाही. ती तिच्या स्टाईलवर ठाम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 उर्फीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, उर्फीने ‘बडे भैय्या की दुल्हनियां’, ‘दुर्गा’, ‘बेपनाह’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिच्या या अभिनयापेक्षा ती अशा अतरंगी स्टाईलमुळेच सदैव नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते. (Bollywood actress Urfi Javed dress video made directly from adhesive tape goes viral)

आधिक वाचा-
‘तू आज आमच्यात नाहीस, पण…’, हार्दिक जोशीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, म्हणाला, ‘फक्त तुझ्यामुळे…’
लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाची पोस्ट, म्हणाली…

हे देखील वाचा