Tuesday, July 9, 2024

काय सांगता! भारती सिंगने केले तब्बल १५ किलो वजन कमी; टीप्स सांगत म्हणाली, ‘मी १२ नंतर…’

भारती सिंग हे टेलिव्हिजनवरील एक असे नाव आहे, जिची फक्त उपस्थितीच प्रेक्षकांना पुरेशी असते. ती दिसता क्षणीच कॉमेडी तिच्या बॉडी लँग्वेजमधून दिसते. भारती सिंग या दिवसात ‘डान्स दिवाने ३’ हा शो होस्ट करत आहे . शोच्या सेटवर ती तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत मस्ती करताना दिसत असते. प्रेक्षकांना नेहमीच हास्याच्या महासागरात नेऊन सोडणाऱ्या भारती सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. कॉमेडियन भारतीने एका मुलाखतीदरम्यान तिच्या वजनाविषयी सांगितले आहे. अनेकदा भारतीला तिच्या वजनावरुन ट्रोल देखील केले जाते.

वजन कमी झाल्यामुळे भारतीचा ‘हा’ आजारही आला नियंत्रणात
भारती म्हणाली की, “वजन कमी केल्यानंतर मधुमेहसारख्या आजारांवर तात्काळ बरे होण्यास मदत होते. श्वास घेताना त्रास होत नाही आणि दम्यावर नियंत्रण आले आहे. माझ वजन पूर्वी ९१ किलो होते. मात्र, आता ७६ किलो आहे. मी अधूनमधून उपवास करते. पण आता मला खूप छान वाटते. परंतु, मला आजही विश्वास बसत नाही की, माझ वजन तब्बल १५ किलो घटले आहे. त्यामुळे मला हलकं हलकं वाटत आहे.” ती पुढे म्हणाली की, “ट्रांसफॉर्मेशन विषयी हर्ष नाराज आहे. कारण, बाहेरचे अन्न खाण्यास मी नकार देते. त्यामुळे त्याचेही बाहेरचे खाणे बंद होते आणि तो चिडतो.”

दुपारी १२ च्या नंतर भारती अन्न खाते कारण…
भारती म्हणाली की, “मी संध्याकाळी ७ ते दुपारी १२ च्या दरम्यान काहीही खात नाही. मी फक्त दुपारी १२ नंतर जेवण करते. तसेच मी संध्याकाळी ७ नंतर रात्रीचे जेवण करत नाही. मी ३० ते ३२ वयात भरपूर अन्न खाल्ले आणि त्यानंतर, मी माझ्या शरीराला कमी होण्यासाठी वर्षभर वेळ दिला, मग तेव्हा शरीर तंदुरुस्त झाले.

भारतीला आहे स्वतःचा अभिमान
भारतीने हे देखील कबूल केले की, वजन कमी करुन तिने अनेक चाहत्यांच्या मनावर एक छाप पाडली आहे. परंतु, तिला स्वतःचा खूप अभिमान वाटत आहे. पण जेव्हा ती स्वतःला पडद्यावर पाहते तेव्हा ती खूप आनंदी वाटते. भारती सध्या ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘डान्स दिवाने ३’ मध्ये काम करताना दिसत आहे.

कोरोना महामारीमुळे भारती करत नाहीये ‘फॅमिली प्लॅनिंग’ मुलांचा विचार
भारती नुकत्याच एका एपिसोडमध्ये म्हणाली होती की, “ती आणि हर्ष एक मुलाचा विचार करत होते. परंतु, संपूर्ण जगाला कोरोना विषाणूने वेढले आहे. हे पाहून त्यांनी त्यावर पुनर्विचार केला आहे.” यावर ती पुढे म्हणाली की, “आम्ही मुलाचा विचार करत आहोत. परंतु, कोरोना प्रकरणांबद्दल ऐकल्यानंतर आम्हाला हा विचार आताच योग्य वाटत नाही.” तसेच ते दोघे जाणूनबुजून मूल होण्याबद्दल बोलत नाही. आता आगामी काळात भारती मुलाविषयी काय सांगणार हे ऐकणे रंजक ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा