Sunday, August 9, 2026
Home बॉलीवूड सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; बोमन इराणींच्या जवळच्या व्यक्तीचे निधन

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; बोमन इराणींच्या जवळच्या व्यक्तीचे निधन

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस १३’ शोचा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले होते. त्याच्या दु:खातून अजूनही सिनेसृष्टी सावरलेली नसतानाच आता आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. अभिनेते बोमन इराणी यांच्या सासऱ्यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. ही माहिती बोमन यांनी सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दु:खद म्हणजे यापूर्वी याच वर्षी जूनमध्ये बोमन यांच्या आईचेही निधन झाले होते. त्या ९४ वर्षांच्या होत्या.

आपल्या सासऱ्यांच्या निधनानंतर बोमन इराणी खूपच दु:खात आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या सासऱ्यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच पत्नी जेनोबिया यांच्या वडिलांच्या आठवणीत एक खूपच भावुक पोस्टही लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “त्यांनी कधीही तक्रार केली नाही. ते नेहमी कृतज्ञ होते. त्यांनी कधीही चांगले काम करण्याची संधी सोडली नाही. त्यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीशी मी कधीही भेटलो नाही.” (Actor Boman Irani Father In Law Passes Away In Age 86)

“त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षीही कोणतेही सेलिब्रेशन शानदार बनवण्याची संधी सोडली नाही. तसेच आम्हालाही सेलिब्रेशन करण्यास सांगितले. जेनोबियाचे वडील आणि नायक परवेज. माझ्या आणि माझ्या मुलांसाठी प्रेरणा. तुमची सदैव आठवण येईल,” असेही आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले.

बोमन इराणी यांच्याव्यतिरिक्त त्यांचा मुलगा कायोज इराणीनेही आपल्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कायोज इराणीने आपल्या आजोबांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने आजोबांचा फोटो शेअर करत त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवले. बोमन आणि कायोज यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत युजर्सही दु:ख व्यक्त करत आहेत.

त्यांच्या या पोस्टवर आतापर्यंत अभिनेते चंकी पांडे, विराफ पटेल आणि तारा शर्मा सलूजा यांसारख्या कलाकारांनी बोमन यांच्या पोस्टवर संवेदना व्यक्त केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा