Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड ब्रह्मा मिश्रासारखीच ‘या’ कलाकारांनीही घेतली अचानक एक्झिट, एक तर दोन दिवस लटकला होता पंख्याला

ब्रह्मा मिश्रासारखीच ‘या’ कलाकारांनीही घेतली अचानक एक्झिट, एक तर दोन दिवस लटकला होता पंख्याला

‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमधील ललित ही भूमिका निभावणार कलाकार ब्रम्हा मिश्रा याचे नुकतेच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याचा मृतदेह त्याच्या घरात तीन दिवसांनी बाथरूममध्ये सापडला. पोस्टमार्टम केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. असे बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार होते ज्यांचे अचानक निधन झाले होते. चला तर जाणून घेऊया त्या कलाकारांबद्दल ज्यांनी अचानक या जगाचा निरोप घेतला.

परवीन बाबी
१९७६ मध्ये टाईम मॅगझिन कव्हरवर आलेली पहिली बॉलिवूड स्टार परवीन बाबीचा मृतदेह २२ जानेवारी २००५ मध्ये जेव्हा तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाला तेव्हा सगळेच हैराण झाले होते. माध्यमातील वृत्तानुसार परवीनची बॉडी तीन दिवस तिच्या घरात होती. १९७० ते १९८० दरम्यान बॉलिवूडमध्ये नाव कमावलेली अभिनेत्री परवीन तिच्या मृत्यू आधी अगदी एकटी पडली होती. परंतु अजूनही ही माहिती समजली नाही की, तिने सुसाईड केले होते की, तिचा मृत्यू प्राकृतिक झाला होता.

ओम पुरी
अभिनेता ओम पुरी यांचा मृत्यू ६ जानेवारी, २०१७ मध्ये झाला. सुरुवातीला अशी माहिती आली होती की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु पोस्टमॉर्टमनुसार आलेल्या माहितीनुसार त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना जेव्हा ते घरात एकटेच होते. सकाळी त्यांच्या ड्रायव्हरने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. या बातमीने सगळ्यांना धक्का बसला. त्यांनी त्याच्या करिअरमध्ये ३०० पेक्षाही अधिक चित्रपटात काम केले होते.

समीर शर्मा
‘ये रिश्ते है प्यार के’, ‘कहाणी घर घर की’, या मालिकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता समीर शर्माने ऑगस्ट २०२० साली त्याच्या घरी आत्महत्या केली. त्याचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृतदेह समोर आला. त्याच्या सोसायटीच्या गार्डने त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला काढला. त्याच्या चाहत्यांना या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला होता.

कृतिका चौधरी
कंगना रणौतसोबत ‘रज्जो’ चित्रपटात आणि क्राईम सिरियल ‘सावधान इंडिया’ या मालिकेत काम केलेली अभिनेत्री कृतीका चौधरी हिचा मृत्यू २०१७ मध्ये मृत्यू झाला. तिचा मृतदेह मुंबईमधील एका बिल्डिंगमध्ये मिळाला होता. त्यावेळी पोलिसांनी माहिती दिली होती की, तिचा मृत्यू ४ दिवसांपूर्वी झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ती घरात एकटीच राहत होती. एकदा अचानक तिच्या फ्लॅटमधून वास येऊ लागला तेव्हा सोसायटीमधील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तिचा मृतदेह बाहेर काढला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा