भारतीय सिनेसृष्टीबद्दल बोलायचं झालं, तर कदाचित मानधन घेण्याच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांचा हात कुणी पकडत नाही. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी कोट्यवधी रुपये आकारतात. प्रत्येक निर्मात्याला आपल्या सिनेमांमध्ये या कलाकारांना घ्यायचे असते, परंतु अनेकदा हे कलाकार निर्मात्यांच्या खिशाला परवडत नसतात. मात्र, सुपरस्टार सलमान खान याच्याबद्दल असे क्वचितच घडते, जेव्हा तो सिनेमासाठी एकही रुपया घेत नाही. सलमानने ‘लुसिफर’ या हॉलिवूड सिनेमाच्या ‘गॉडफादर’ या रिमेकमध्ये काम केले आहे. या सिनेमात तो चिरंजीवी यांच्यासोबत झळकणार आहे. खुद्द चिरंजीवी यांनी सलमानबद्दल मोठे भाष्य केले आहे.
‘गॉडफादर’ (Godfather) या सिनेमाचा टीझर व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये सलमान खान (Salman Khan) आणि चिरंजीवी (Chiranjeevi) यांचा दमदार अंदाज पाहायला मिळाला. हा टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
स्क्रिप्ट न वाचताच सलमान झाला तयार
सलमान खान याने या सिनेमाची स्क्रिप्ट न वाचताच, या सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला होता. इतकेच नाही, तर त्याने या सिनेमात काम करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही. एका मुलाखतात चिरंजीवी यांनी सांगितले की, कशाप्रकारे दिग्दर्शक मोहन राजा यांनी या रोलसाठी सलमानचे नाव सुचवले होते आणि म्हटले होते की, तो आमचा सर्वोत्तम कौटुंबिक मित्र आहे.
View this post on Instagram
जेव्हा चिरंजीवी यांनी केलेला सलमानला मेसेज
चिरंजीवी यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी सलमान खान याला मेसेज केला, तेव्हा त्याचा लगेच रिप्लाय आला की, “हां, चिरू गारू, सांगा ना काय काम आहे?” त्यावेळी चिरंजीवी यांनी त्याला सांगितले की, “एक छोटा रोल आहे, पण खूप आदरणीय रोल आहे. संदर्भासाठी लुसिफर सिनेमा पाहू शकतो.” यावर सलमान म्हणाला की, “नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी हा रोल करतोय. तुम्ही तुमच्या माणसाला पाठवून द्या. आम्ही तारीख वगैरे ठरवू.” चिरंजीवी यांनी सांगितले की, “फक्त 2-3 मिनिटात तो या रोलसाठी तयार झाला होता.”
सलमान खानने प्रोड्युसरला म्हटले, ‘निघून जावा’
चिरंजीवी यांनी सांगितले की, “जेव्हा माझा प्रोड्युसर त्याच्याकडे गेला आणि त्याला काही पैसे ऑफर केले (सलमानला किती पैसे ऑफर केले पाहिजेत, याचा विचार न करता), तेव्हा सलमान म्हणाला की, ‘तुम्ही राम आणि चिरंजीवीसाठी माझे प्रेम विकत घेऊ शकत नाहीत. निघून जावा.'” चिरंजीवी यांनी सांगितले की, “मी सल्लू भाईच्या या निर्णयासाठी कृतज्ञ आहेत.”
बॉलिवूड आणि टॉलिवूड कलाकारांची एकमेकांशी चांगली बाँडिंग असल्याचे यावरून दिसते. आता या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी प्रवणीच ठरणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात ठार वेडा झालेला चाहता, आख्खी जमीनच करून बसला होता नावावर
सिनेमासोबतच राजकारणाचं मैदानही गाजवणार कंगना रणौत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट