बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दलिप ताहिलबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. दलिप ताहिलला दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.अभिनेत्याला पाच वर्षे जुन्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण 2018 सालचे आहे. बॉलिवूड अभिनेते दलिप ताहिल यांना मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून रिक्षाला धडक दिल्याबद्दल दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील खार येथे घडली होती.
दारूच्या नशेत एका ऑटोरिक्षाला दलिप ताहिलच्या (Dalip Tahil) कारने धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. डॉक्टरांच्या अहवालात अल्कोहोलचा वास आणि अभिनेता त्यावेळी नीट चालू शकत नसल्याच्या पुराव्यावर विश्वास ठेवून कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. शिवाय त्याला नीट बोलताही येत नव्हते. रिक्षात प्रवास करणाऱ्या महिलेने याप्रकरणी अभिनेत्याला जाब विचारला असता त्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
हे सर्व पुरावे लक्षात घेऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी दलिप ताहिलला दोषी ठरवून दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षे जुन्या प्रकरणात दलिप ताहिलला मुंबईतून अटक करण्यात आली होती, मात्र नंतर या अभिनेत्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांपासून हे प्रकरण सातत्याने सुरू आहे. आता याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने दलीपला दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
दलिप ताहिल ऑटोरिक्षाला धडकल्यानंतर तेथून पळून गेला होता. यासोबतच दलीपने रक्त तपासणीसाठी पोलिसांना आपला नमुना देण्यास साफ नकार दिल्याचेही एका अहवालात सांगण्यात आले आहे. दलिप ताहिल हे 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. दलिप ताहिल यांनी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात बाजीगर, राजा, इश्क आणि डर या चित्रपटांचा समावेश आहे. (Actor Dalip Tahil of Baazigar fame has been sentenced to two months in jail)
आधिक वाचा-
–एवढ्यात तर आपलं आयुष्य जाईल राव! ‘रामायण’ चित्रपटासाठी यशने घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी
–सलमानचा बॉडीगार्ड शेराच्या आईला शिवीगाळ..,सोसायटीतील सदस्याविरोधात तक्रार दाखल