Monday, June 17, 2024

मोठी बातमी! अभिनेते दलिप ताहिल यांच्या मुलाला अटक, ड्ग्ज पेडलरशी व्हॉट्सऍपवर साधायचा संवाद

प्रसिद्ध अभिनेते दलिप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी)  ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एनसीबी मुंबईने ही माहिती दिली आहे. वृत्तानुसार, पोलिसांनी ड्रग पेडलर मुजम्मिल अब्दुल शेख याला अटक केली. त्याच्याकडून ३५ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग जप्त करण्यात आले आहे.

तपासादरम्यान, मुजम्मिलच्या व्हॉट्सऍप चॅटवरून असे समोर आले आहे की, ध्रुवने त्याच्याकडे २०१९-२०२१ पर्यंत अनेक वेळा ड्रग्जची मागणी केली होती. तसेच ड्रग्ज विकत घेण्यासाठी, ध्रुवने मुजम्मिलच्या खात्यात ६ वेळा पैसे जमा केले होते. ध्रुव सर्व पैसे ऑनलाईन देत असत. ही माहिती समजल्यानंतर, ध्रुवच्या घरावर टाकलेल्या छाप्यात त्याला अटक करण्यात आली.

वृत्तानुसार, ध्रुवविरोधात सीआर क्रमांक ३४/२०२१ यू / एस ८ (सी) आर / डब्ल्यू २२ (बी) एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्रुवच्या अटकेबाबत त्याचे वडील दलिप ताहिल यांचे कोणतेही विधान समोर आले नाही आहे. यावेळी अँटी नार्कोटिक्स सेलचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर, एक वर्षानंतरही बरीच नावे मुंबईच्या ड्रग्ज कार्टेलशी संबंधित आहेत. यापूर्वी एनसीबीने दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, अर्जुन रामपाल आणि अनेक सेलिब्रिटींना ड्रग्ज प्रकरणी समन्स बजावले होते. त्याच वेळी ड्रग्ज प्रकरणात भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांना अटक करण्यात आली होती. ध्रुवच्या अटकेमुळे बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनू सूदच्या घराबाहेर मदतीसाठी लोकांची गर्दी, कौतुक करत चाहतेे म्हणाले ‘तो हनुमान आहे’

-जुही चावलाची मुलगी करणार बॉलिवूड पदार्पण? आयपीएल ऑक्शन दरम्यान झाली होती शाहरुख खानच्या मुलासोबत स्पॉट

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट

हे देखील वाचा