साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार धनुष (Dhanush) त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. अलीकडे धनुष ऐश्वर्या रजनीकांतपासून (Aishwarya Rajinikanth) घटस्फोट घेतल्याने चर्चेत होता. लग्नाच्या १८ वर्षानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले, ज्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. पण, सध्या धनुष एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. मद्रास हायकोर्टाने धनुषविरोधात समन्स बजावले आहे, त्यामुळे धनुष सध्या चर्चेत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
मदुराई येथील एका जोडप्याने धनुष त्यांचा मुलगा असल्याचा दावा केला आहे. मदुराई येथील रहिवासी कथिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी यांनी धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचा दावा केला होता. मुद्दा थोडा जुना आहे. हे प्रकरण प्रदीर्घ काळ न्यायालयात सुरू असून, त्याचा निर्णय येणे बाकी आहे. दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेत्याला समन्स बजावले आहे. रिपोर्टनुसार, कोर्टाने धनुषला हे समन्स अशा वेळी पाठवले आहे, जेव्हा कथिरेसनने अभिनेत्यावर खोट्या पितृत्व चाचणीची बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिस तपासाची मागणी दाम्पत्याने केली आहे. कथिरेसनने स्वतःला धनुषचे खरे वडील असल्याचा दावा केला आहे आणि अभिनेत्यावर चुकीचा नमुना चाचणी अहवाल न्यायालयात सादर केल्याचा आरोप केला आहे.
२०२० मध्ये मदुराई उच्च न्यायालयाने काय म्हटले?
धनुषने सादर केलेला कागद बनावट असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा मदुराई उच्च न्यायालयाचा २०२०चा आदेश रद्द करण्यासाठी त्याने मद्रास उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या दाम्पत्याच्या अर्जानंतर न्यायालयाने आता धनुषला या संदर्भात समन्स बजावले आहे. कथिरेसन आणि मीनाक्षी सांगतात की, धनुष त्यांचा तिसरा मुलगा आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी तो आपले शहर सोडून चेन्नईला गेला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या धनुषच्या या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-