×

आनंदाची बातमी! ‘कोलावरी डी’ बॉय धनुष करतोय हॉलिवूडमध्ये पदार्पण, लूकवर चाहते फिदा

‘कोलावरी डी’ गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता धनुष (Dhanush), सध्या सर्वात मोठा दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयाचे आणि दमदार लूकचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. अनेक सुपरहीट चित्रपटात धनुषने काम केले आहे ज्यामधील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यामुळेच सिने जगतात नेहमीच या प्रतिभावान कलाकाराची चर्चा पाहायला मिळत असते. त्याचप्रमाणे सुपरस्टार धनुष आता लवकरच हॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

साऊथचा सुपरस्टार धनुष लवकरच ‘द ग्रे मॅन’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचे चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पुर्वी नेटफ्लिक्सने त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. नेटफ्लिक्सने मंगळवारी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर अँथनी आणि जो रुसो दिग्दर्शित चित्रपटातील धनुषचा फर्स्ट लुक शेअर केला. या चित्रपटात रायन गॉसलिंग, ख्रिस इव्हान्स, अना डी आर्मास, रेगे-जीन पेज, जेसिका हेनविक, बिली बॉब थॉर्नटन आणि वॅगनर मौरा यांच्याही भूमिका आहेत. नेटफ्लिक्स इंडियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये घनुष एका कारच्या वर दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘द ग्रे मॅनमध्ये धनुषचा फर्स्ट लूक’ असे लिहिले आहे. आता धनुषच्या फर्स्ट लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

या फोटोवर धनुषच्या चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने “संपूर्ण भारतीय सिनेमासाठी अभिमानाचा क्षण” असे म्हणत आपला आनंद व्यक्त केला आहे तर आणखी एकाने “आमचा नायक परत आला आहे” असे म्हणत धनुषचे कौतुक केले आहे. हा चित्रपट २००९ मध्ये मार्क ग्रेनीच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे ज्याची कथा कोर्ट जेन्ट्री (रायन), एक फ्रीलान्स मारेकरी आणि माजी CIA ऑपरेटिव्ह यांच्याभोवती फिरते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका मुलाखतीदरम्यान धनुषने चित्रपटाच्या दिग्दर्शक रुसो बंधूंचे कौतुक केले होते. ‘द ग्रे मॅन’मध्ये काम केल्यानंतर खूप काही शिकायला मिळाले, असे तो म्हणाला.

दरम्यान धनुष शेवटचा तमिळ एक्शन चित्रपट ‘मारन’मध्ये दिसला होता. या चित्रपटात मालविका मोहननेही काम केले होते. कार्तिक नरेन लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट डिस्ने + हॉटस्टार वर ११ मार्च रोजी तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला होता. .याआधी अभिनेता धनुष पत्नी ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या बातमीने चांगलाच चर्चेत आला होता. या बातमीने त्यावेळी संपूर्ण सिने जगताला जोराचा धक्का दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post