Saturday, April 20, 2024

‘ड्रग्स खरेदी करताना लाज बाळगा, कंडोम खरेदी करताना नाही!’; नुसरत भरुचाच्या चित्रपटाचे दमदार पोस्टर रिलीझ

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ही अभिनेत्री लवकरच तिच्या ‘जनहित में जारी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. अखेरची ‘छोरी’ चित्रपटात दिसलेली ही अभिनेत्री लवकरच एका महत्त्वाच्या सामाजिक संदेशासह मोठ्या पडद्यावर परतणार आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

नुसरतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. समोर आलेल्या या नवीन पोस्टरमध्ये अभिनेत्रीची वेगळीच स्टाईल पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील तिचा नवीन लूक शेअर करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुरक्षितेचे व्यसनी व्हा….ही सूचना है….जनहित में जारी १० जून २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीझ होत आहे.” (janhit mein jaari nushrratt bharuccha shared the new poster of the film)

याशिवाय अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्वतःची एक व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये नुसरत वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. तसेच, हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बोटं नाही, तुमचे विचार वर करा… ही सूचना आहे… जनहित में जारी १० जून २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीझ होत आहे.”

विशेष म्हणजे, ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटानंतर अभिनेत्री नुसरत भरुचा आणि राज शांडिल्य दुसऱ्यांदा या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर ‘जनहित में जारी’ या चित्रपटाची कथा एका विशिष्ट चौकटीबाहेरील, जी विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने सादर केली जाईल. या चित्रपटात नुसरत पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे.

‘जनहित में जारी’ हा एक असामान्य पण प्रासंगिक चित्रपट असेल, जो त्याच्या विषयासह जुन्या परंपरांना तोडण्याचा प्रयत्न करेल. चित्रपटातील नुसरतच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेत्री तिच्या शहरातील कंडोम विक्रेतीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुसरतशिवाय अन्नू कपूर, अनुद सिंग ढाका आणि परितोष त्रिपाठी हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा