ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज भल्याही चित्रपटांपासून दूर असतील, पण त्या इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या आपल्या जुन्या मित्रांना आजही भेटतात, त्यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देतात. अलीकडेच, त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये त्या त्यांचे सहकलाकार असलेल्या धर्मेंद्रसोबत दिसल्या.
मुमताजला त्यांच्या घरी पाहून धर्मेंद्र खूप आनंदी दिसत होते. त्यांनी मुमताजचे मनापासून स्वागत केले. यावेळी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौरही त्यांच्यासोबत होत्या. धर्मेंद्र मुमताजला भेटल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काही फोटोंमध्ये धर्मेंद्र मुमताजसोबत पोज देताना दिसत आहेत. असाच एक फोटो मुमताजच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही शेअर करण्यात आला आहे.
मुमताज यांच्या एका फॅन पेजवर या भेटीचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांनी गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केलेला दिसत आहे. तर धर्मेंद्र यांनी डार्क शर्ट आणि ट्राउजरसह पोलो कॅप घातली होती. जेव्हा धर्मेंद्र आणि मुताज यांची भेट झाली तेव्हा धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने प्रकाश कौर यांनी मुताज यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी एक सुंदर पांढरा सूट घातला होता.
धर्मेंद्र यांना भेटल्यानंतर मुमताजने जॅकी श्रॉफ आणि आशा भोसले यांचीही भेट घेतली. या दोघांनी ‘लोफर’ आणि ‘झील के उस पार’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना मुमताज यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “सो स्वीट.” त्यांनी सोबतच हार्ट इमोजी वापरले आहेत. मुमताज यांनी त्यांचे डोके धर्मेंद्रच्या खांद्यावर ठेवले आहे. दोघांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले की, “तुम्ही दोघेही माझे आवडते कलाकार आहात. तुम्हाला एकत्र पाहून आनंद झाला.” त्याचबरोबर जॅकी श्रॉफ आणि आशा भोसले यांच्यासोबत मुमताजच्या फोटोला देखील चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’
–‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…
–सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार