Tuesday, September 26, 2023

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

अभिनेता रंजीत हे एक उत्तम उदाहरण आहे की, पूर्वीच्या काळात नायक किंवा खलनायकाच्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांना प्रेक्षक किती गांभीर्याने घेत असे. आपल्या सर्वांना माहित आहे की, ७० च्या दशकात रंजीत हे अनेक चित्रपटांमध्ये मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसले. ते  चित्रपटात नेहमी एखाद्याला मारताना, कोणाचा विनयभंग करताना किंवा एखाद्या व्यक्तीला लुटताना दिसायचे. एकंदरीत, त्यांना फक्त नकारात्मक भूमिका मिळायच्या आणि त्यामुळेच त्यांची इमेज वाईट व्यक्तीसारखी बनली होती.

सुप्रसिद्ध अभिनेता असलेले ७० च्या दशकातील रंजीत आता चित्रपटांपासून दूर आहेत. पण अजूनही ते हिंदी चित्रपटांतील नकारात्मक भूमिकेसाठी ओळखला जातात. विशेषत: बलात्कारी म्हणून रंजीत यांना ओळख मिळाली. ७० च्या दशकात त्यांची प्रतिमा बलात्कारी अशी झाली. त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये बलात्काऱ्याची भूमिका साकारली होती. वास्तविक जीवनात त्यांना चित्रपटात हे पात्र साकारण्याचे फळ भोगावे लागले होते.

माध्यमांशी संवाद साधताना रंजीत म्हणाले की, “मी माझ्या आई -वडिलांना भांडताना कधीच पाहिले नव्हते. माझ्या पत्नीचे स्वतःचे मत आहे आणि आमचे स्वतःचे युक्तिवाद आहेत. विशेषत: राजकारणावर कारण आम्ही दोघेही खूप भिन्न विचार करतो.” त्याचबरोबर त्यांनी असाही खुलासा केला की, त्यांच्या चित्रपटांतील नकारात्मक भूमिकेमुळे त्यांना पत्नी मिळणेही कठीण झाले होते.

पत्नी आलोकासोबतच्या भेटीबद्दल बोलताना रंजीत म्हणाले, “मी तिला माझ्या चित्रपटात कास्ट करणार होतो आणि तेव्हाच मी तिला भेटलो. पण, माझ्या आई -वडिलांनी माझ्यासाठी तिला पसंत केले. ती मॉडर्न पण होती आणि भारतीयपण होती. ती इंग्रजी आणि पंजाबी भाषा बोलायची. मला आणखी काय हवे होते. माझा धाकटा भाऊ आणि बहीण विवाहित होते आणि माझ्या पालकांना मला सेटल झालेले पाहायचे होते. पण त्या काळात मला कोणीच मुलगी देण्यास तयार नव्हते.”

मात्र, कसेतरी रंजीत यांनी आलोकाशी लग्न केले. पण, तेही तितके सोपे नव्हते. आलोकाचे रंजीतशी लग्न झाल्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्य अजिबात खूश नव्हते. रंजीत म्हणाले की, “शेवटी मी आलोकाशी लग्न केले. पण, हे तिच्या नातेवाईकांच्या निराशेचे कारण ठरले. मी माझ्या सासरच्या लोकांशी बोललो आणि खाजगी समारंभांसाठी आग्रह धरला. नंतर माझ्या पत्नीच्या एका नातेवाईकाला कळले की, तिने माझ्याशी लग्न केले आहे.”

“तो माझ्या सासूला म्हणाला की, तुम्ही मुलीला रंजितशी लग्न लावून देण्याऐवजी विष पाजायला पाहिजे होते किंवा पाण्यात ढकलून द्यायला हवे होते. त्याने माझ्या सासूला भडकवण्याचा प्रयत्न केला. पुढे ती व्यक्ती म्हणाली, तुमच्या मुलीच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहे की नाही हे नेहमी बघा.  कारण रंजीत मद्यपान करून तिला मारहाण करतो की नाही हे समजेल.”

रंजीत हे काही काळापूर्वी द कपिल शर्मा शोमध्ये दिसले होते. यादरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विनयभंगाचे सीन पाहून त्यांना घराबाहेर काढले होते. रंजीत यांचे कुटुंब शर्मिली चित्रपटातील राखीसोबतच्या त्यांच्या वाईट वागण्यामुळे खूप रागावले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘जवान’च्या यशावर अक्षय कुमारने दिल्या शुभेच्छा; शाहरुख म्हणाला, ‘तू प्रार्थना केली होती मग..’
डिलिव्हरीसाठी जाताना स्वतः गौहर खानने चालवली होती गाडी, अभिनेत्रीने शेअर केला ‘तो’ अनुभव
लेखक-दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचा खास विदेशी सन्मान; सामान्य कुटुंबातील तरुणाची असामान्य कामगिरी!

हे देखील वाचा