Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड जेव्हा दिलीप कुमारांच्या डोळ्यात आले होते कादर खान यांच्यामुळे अश्रू, अभिनेत्याला मानावी लागली होती ‘ही’ अट

जेव्हा दिलीप कुमारांच्या डोळ्यात आले होते कादर खान यांच्यामुळे अश्रू, अभिनेत्याला मानावी लागली होती ‘ही’ अट

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मात्र हे यश मिळवण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होते ती अभिनेते कादर खान (Kadar Khan) यांची. कादर यांनी चित्रपट क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. त्यांच्याच आयुष्याशी निगडीत एक भन्नाट किस्सा आपण पाहणार आहोत, जो ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल.

कादर खान हे हिंदी चित्रपट जगतातील एक दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अनेक दशके चित्रपट जगतात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. त्यांच्या चित्रपटांची आजही चर्चा होत असते. इथपर्यंत येण्यासाठी त्यांना प्रचंड बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या चित्रपटातून कादर खान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. त्यांना हा चित्रपट मिळण्याचीही एक भन्नाट कथा आहे, ज्याचा खुलासा खुद्द कादर खान यांनी केला होता.

हा संपुर्ण किस्सा कादर खान चित्रपटात झळकण्यापूर्वी घडला होता. ज्यावेळी ते नाटकात काम करायचे. त्याचबरोबर ते नाटकेही लिहीत होते. त्यांना घरच्या बिकट परिस्थितीमुळे ते प्राध्यापकाची नोकरीही करत होते. त्यांच्या एक नाटकाबद्दल ऐकून खुद्द दिलीप कुमार यांनी त्यांनी कॉल केला होता. याबद्दल बोलताना कादर खान म्हणाले होते की, “मी वर्गात शिकवत असताना शिपाई कॉल आल्याचे सांगत बोलवायला आला. ज्यावेळी मी कार्यालयात गेलो तेव्हा सगळेजण उभे राहून बॉंम्ब फुटल्यासारखे माझ्याकडे पाहत होते. मी जेव्हा फोन उचलला त्यावेळी पलिकडे युसूफ खान बोलत असल्याचे सांगितले. यावेळी मी कोण युसूफ खान असे विचारले. तेव्हा ते ‘मला चित्रपट जगतात दिलीप कुमार म्हणून ओळखतात’ असे सांगताच माझ्या हातातून फोनच पडला. यावेळी दिलीप कुमार यांनी कादर खान यांच्या नाटकाचे कौतुक करताना, ते नाटक पाहायचे असल्याचे सांगितले.

दिलीप कुमार यांच्या या इच्छेवर कादर खान यांनी यायचे असेल, तर वेळ काढून या आणि हे नाटक संपूर्ण पाहा अशा दोन अटी ठेवल्या होत्या. जेव्हा हे नाटक दिलीप कुमार यांनी पाहिले तेव्हा ते संपूर्णवेळ रडत होते. त्यांना हे नाटक खूप आवडले आणि खुश होऊन त्यांनी आपल्या दोन आगामी चित्रपटात घेण्याची घोषणा केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘गाडीवाला आलाय घरातून कचरा काढा’, परिणीतीचा न्यूड फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले चांगलेच ट्रोल
कधीकाळी अनुष्कासाठी काम करणाऱ्या परिणीतीचे काही महिन्यातच पालटले नशीब; पुढे बनली स्टार अभिनेत्री

हे देखील वाचा