नादच खुळा! ‘तूफान’साठी फरहान एका दिवसात घ्यायचा ४५०० कॅलरी; तर करायचा ३०० किलोपर्यंतचे लेग प्रेस


अभिनेता फरहान अख्तरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत ‘भाग मिल्खा भाग’ या सुपरहिट चित्रपटात काम केले होते. आता याच दिग्दर्शकासोबत त्याने ‘तूफान’ या नवीन चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट शुक्रवारी (१६ जुलै) ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. जवळपास १९ महिन्यांच्या शूटिंगदरम्यान फरहानने वजन वाढवण्यासाठी जबरदस्त ट्रेनिंग घेतली होती. चित्रपटात तो निभावत असलेल्या पात्राचे म्हणजेच अजीज अलीचे व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पुनरागमन दाखवण्यासाठी त्याने आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली होती. नक्कीच त्याच्यासाठी हा प्रवास सोप्पा नव्हता.

माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपटासाठी आपल्या ट्रेनिंगबाबत बोलताना फरहानने सांगितले की, त्याला तब्येत बनवण्यापेक्षा अधिक समस्या आपला आकार मोठा करण्यात झाली. (Actor Farhan Akhtar Used To Take 4500 Calories In A Day For Toofan Used To Do 300 KG Leg Press)

तो म्हणाला, “असे नाही की, हे शारीरिकरीत्या करणे कठीण होते. तुम्ही ट्रेनिंग बंद करता, तुम्ही हवं ते खाऊ सकता. मी जवळपास १४ किंवा १५ किलो वजन वाढवले होते. मला स्वत:ला मोठा दाखवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रोस्थेटिकवर अवलंबून राहायचे नव्हते.”

त्याने खुलासा केला की, अशाप्रकारच्या वजनाने तुमच्या एनर्जीवर थोडा परिणाम होतो. तो म्हणाला की, “तुमच्या चालण्यावर परिणाम होतो. हे तुमच्या श्वास घेण्याच्या पद्धतीवर परिणाम करते. जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा एका वेगळ्याच व्यक्तीप्रमाणे जाणवते.”

फरहानच्या बॉक्सिंग ट्रेनर ड्रियू नीलने खुलासा केला की, अभिनेत्यासाठी वजन वाढवणे सोप्पे नव्हते. कारण तो एक एक्टोमॉर्फ आहे. असे लोक, ज्यांच्यासाठी वजन वाढवणे कठीण असते. नील म्हणाला की, “अधिक जेवण केल्याने आरोग्यावर अनेकप्रकारे परिणाम होतो. त्यामुळे आम्ही हे म्हणू शकत नाही की, ट्रेनिंग बंद करा आणि खूप खावा. हे योग्य नाही. एक काळ होता, जेव्हा फरहानला दिवसाला ४५०० ते ५००० कॅलरीपर्यंत खावे लागत होते. मी फरहानसोबत जिममध्ये असायचो आणि तो २५० ते ३०० किलोपर्यंत लेग प्रेस करायचा, जे पहिल्यापेक्षा अधिक होते. असे झाले, कारण तो अधिक कॅलरी घेत होता, अधिक फळं खात होता. त्याच्याकडे असे करण्याची ताकद होती.”

फरहान शेवटचा सन २०१९ मध्ये आलेल्या ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत प्रियांका चोप्राही होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज

-‘ब्युटीफुल नारी इन पिंक सारी!’ मराठमोळ्या ऋतुजा बागवेच्या साडी लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

-प्रेग्नन्सीवेळी केलेल्या फोटोशूट दरम्यान करीना कपूर झाली होती बेशुद्ध, म्हणाली, ‘मला या काळात खूप…’


Leave A Reply

Your email address will not be published.