आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल आणि त्यांच्या चित्रपटांपूर्वीच्या आयुष्याबद्दल फॅन्सला जाणून घ्यायला खूपच आवडते. कलाकारांचे सुरुवातीचे दिवस, त्यांचा संघर्षाचा काळ आदी माहिती जाणून घेण्यासाठी फॅन्स नेहमी कलाकरांना प्रश्न विचारतात. सोबतच त्यांचे जुने फोटो देखील फॅन्समध्ये चर्चेचा विषय असतो. कलाकार देखील त्यांचे जुने फोटो अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करताना आपण पाहतो. ते देखील जुने फोटो पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा देतात.
कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा सर्वांचाच लाडका आहे. तो जेवढा टेलिव्हिजनवर सक्रिय आहे, तेवढाच तो सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. बऱ्याचदा तो त्याचे व्हिडिओ, त्याच्या मुलांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. मागील काही काळापासून सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या थ्रोबॅक फोटोंच्या यादीत कपिलनेही त्याचा जुना फोटो पोस्ट केला आहे.
कपिलने त्याचा कॉलेजच्या दिवसातील एक फोटो शेअर केला असून, या फोटोमध्ये त्यांचा संपूर्ण ग्रूप दिसत आहे. एकाच्या हातात डफली, तर एकाच्या हातात गिटार दिसते. कपिलचा हा फोटो पहिला, तर त्याला ओळखणे देखील खूपच मुश्किल आहे. कपिलने हा फोटो पोस्ट करत मजेशीर चॅलेंजही दिले आहे. त्याने लिहिले की, “आमच्या नाटकाच्या तालमीनंतर ग्रूपसोबत म्युझिकचा आनंद घेताना. या फोटोत मला शोधा आणि कमेंट करून सांगा.”
कपिलचा हा फोटो पाहून त्याच्या फॅन्सने त्याला या फोटोमध्ये ओळखून कमेंट्स करण्याचा तडाखा लावला आहे. या ग्रूप फोटोमध्ये निळ्या शर्टमध्ये डफली हातात घेतलेला मुलगाच कपिल आहे. त्याला लगेच ओळखणे जरी कठीण असले, तरीही अशक्य नक्कीच नाही.
कपिल शर्माचा लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ हा फेब्रुवारीमध्ये बंद झाला. मात्र, हा शो लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याच्या बातम्या आहेत. कपिलने त्याच्या परिवाराला वेळ देता यावा म्हणून या शोमधून ब्रेक घेतला होता. कपिलने काही महिन्यांपूर्वीच त्याच्या नेटफ्लिक्सच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके
-शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर