प्रेग्नन्सीवेळी केलेल्या फोटोशूट दरम्यान करीना कपूर झाली होती बेशुद्ध, म्हणाली, ‘मला या काळात खूप…’


काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात करीनाने तिचे गरोदरपणातले अनेक अनुभव शेअर केले आहेत. आई होणाऱ्या महिलांसाठी तिचे हे पुस्तक खूप उपयुक्त ठरणार आहे. करीना काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने हे सर्व अनुभव एकत्र करून त्याचे एक पुस्तक बनवले आहे. या पुस्तकामध्ये करीनाने अनेक खुलासे केले आहेत.

करीना तिच्या प्रेग्नन्सी दरम्यान देखील काम करत होती. असेच एकदा काम करताना तिने एक वेगळेच अनुभव घेतला याबद्दल तिने तिच्या पुस्तकात म्हटले आहे, “सामान्य लोकांना नेहमीच वाटत असेल की, कलाकारांची प्रेग्नंसी ही त्यांच्या आयुष्यासारखीच ग्लॅमरस असेल. मात्र, असे नाहीये. मी बऱ्याचदा माझी प्रेग्नन्सी ग्लॅमरस दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. माझे या काळात खूप वजन वाढले होते, मला अनेक स्पॉट देखील आले होते. मी तर संध्याकाळी ५ वाजता देखील झोपायला तयार असायची. मला या काळात खूपदा थकवा यायचा. एकदा मी प्रेग्नंसी दरम्यान एक फोटोशूट करत होती आणि सेटवर अचानक बेशुद्ध झाली होती.”

पुढे ती म्हणाली, “मी माझ्या या पुस्तकात माझे सर्व अनुभव प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही हे पुस्तक वाचा, हसा आणि तुमची प्रेग्नंसी एन्जॉय करा.”

सध्या सोशल मीडियावर करीना कपूरचे बाळासोबतचे काही फोटो तुफान व्हायरल होत असून करीनाच्या या फोटोतील बाळ तिचा दुसरा मुलगा ‘जेह’ असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय हा फोटो तिच्या पुस्तकातील असल्याच्या चर्चा होत आहेत.

‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ चे मुखपृष्ठ लॉन्च केले होते. या पुस्तकाच्या कव्हरचे लाँचिंग झाल्यानंतर ऍमेझॉनमधील प्रथम क्रमांकाचा बेस्टसेलर म्हणून हे पुस्तक ट्रेंडिंगवर आले असून हे काही तासांतच हे पुस्तक पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाले होते. मात्र, आता याच पुस्तकावरुन हा वाद निर्माण झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके

-शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.