सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यास फार वेळ लागत नाही. यामध्ये कलाकारांच्या फोटोचं प्रमाण जरा जास्तच म्हणावं लागेल. कारण, बॉलिवूड कलाकारांचे लहानपणीचे किंवा ओळखता न येणारे असे अनेक फोटो आणि व्हिडिओही असतात, जे जबरदस्त व्हायरल होतात. कलाकार इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रमंडळींचे किंवा सहकलाकारांचे फोटो शेअर करतात, आणि ते काही क्षणातच सर्वत्र वाऱ्यासारखे पसरतात. आताही सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो अभिनेत्री अमिषा पटेल हिने शेअर केला आहे.
सन २००० मध्ये प्रदर्शित झालेला ‘कहो ना प्यार है’ (Kaho Naa Pyaar Hai) हा सिनेमा तुम्हाला आठवतच असेल. या सिनेमातून सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याने अमिषा पटेल (Ameesha Patel) हिच्यासोबत बॉलिवूड पदार्पण केले होते. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. विशेषत: ऋतिकच्या फिटनेस, हँडसम लूकमुळे मुलींमध्ये त्याची भलतीच क्रेझ पाहायला मिळाली होती. मात्र, आता अमिषाने ऋतिकचा तेव्हाचा फोटो शेअर केला आहे, ज्याची सर्वाधिक चर्चा रंगली आहे.
अमिषाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ऋतिकसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऋतिकला ओळखणे कठीण होत आहे. हा फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमावर काम करण्यास सुरुवात केली होती. हा फोटो पाहून ऋतिकचा लूक, फिटनेसचा उल्लेख करण्याबाबत तुम्हालाही लगेच समजेल की, यात ऋतिक वेगळ्याच अंदाजात दिसत आहे.
View this post on Instagram
फोटोत अमिषा, ऋतिकसोबत तिच्या घरी पोझ देताना दिसत आहे. फोटोसोबतच तिने सांगितले आहे की, हे तेच दक्षिण मुंबईतील घर आहे, जिथे ती लहानाची मोठी झाली आहे. या घरात ऋतिकसोबतच्याही अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
अमिषाच्या घरी झालेल्या पार्टीतील फोटो
या फोटोबद्दल सांगताना अमिषा म्हणाली की, त्यावेळी ‘कहो ना प्यार है’ सिनेमाची शूटिंग सुरू होण्यापूर्वी तिच्या घरात तिच्या आणि ऋतिकच्या कुटुंबाने एक शानदार पार्टी केली होती. यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती. अमिषाच्या वक्तव्यावरून समजते की, हा फोटो तिच्यासाठी किती मौल्यवान आहे.
अमिषा आणि ऋतिकचे आगामी सिनेमे
अमिषाच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या कोणत्याही सिनेमात काम करताना दिसत नाहीये. मात्र, ऋतिक त्याच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत आहे. तो ‘फायटर’ आणि ‘विक्रम वेधा’ या आगामी सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितच्या स्थळाला नाही म्हणाले होते सुरेश वाडकर, कारण वाचून व्हाल थक्क
आलियाचं प्रेग्रेंसी फोटोशूट! बेबी बंप प्लॉंन्ट करताना दिसली अभिनेत्री
प्रेग्नेंसीनंतर ‘या’ बिगबजेट चित्रपटातून काजल अग्रवाल करणार रुपेरी पडद्यावर पुनरागमन, स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा










