कलाकार त्यांच्या फॅन्ससोबत जोडलेले राहण्याकरता नेहमी स्वतःबद्दल काही ना काही सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओ खूप ट्रेंडिंग आहे. जवळपास सर्वच कलाकार त्यांचे थ्रोबॅक फोटो, व्हिडिओ पोस्ट करून जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. त्याचे हे जुने व्हिडिओ, फोटो फॅन्समध्ये देखील खूप लोकप्रिय असतात.
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन. ऋतिक नेहमीच मीडियामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. उत्तम अभिनेत्यासोबत एक उत्कृष्ट डान्सर असणारा ऋतिक संपूर्ण जगात लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. ऋतिक देखील इतर कलाकारांसारखा सोशल मीडियावर सक्रिय आहे.
त्याने नुकतेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत त्याचे शानदार मुव्हज पाहायला मिळत आहे. हा एडिटेड व्हिडिओच्या शेवटी लिहिले आहे की, ‘माय डान्स डे.’ दुसरीकडे त्याने हा व्हिडिओ शेअर करत “मंगळवारी मला त्या लोकांमध्ये राहायचे आहे, जे विनाकारण डान्स करू शकतात.” त्याने आपल्या या डान्स मुव्हजने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत २२ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
ऋतिकने नुकताच त्याचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सुपर ३०’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेचा आहे. या व्हिडिओमध्ये ऋतिक त्याच्याच ‘कोई मिल गया’ या सिनेमातील ‘तारों से गगन…जादू…’ हे गाणे गाताना दिसत आहे.
मात्र, या व्हिडिओमधील खरी मजा व्हिडिओ बघताना तुमच्या नक्कीच लक्षात येईल. ऋतिक त्याचे हेच गाणे बिहारी भाषेत गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघताना जेव्हा तुम्ही हे गाणे बिहारी भाषेत ऐकाल, तेव्हा नक्कीच तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. ऋतिकचा ‘सुपर ३०’ हा सिनेमा १२ जुलै, २०१९ ला प्रदर्शित झाला होता. नुकतेच या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत.
ऋतिक त्याचा हा व्हिडिओ ‘मेमरी’ म्हणत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ खूपच कमी वेळात तुफान व्हायरल झाला आहे. त्याने हा व्हिडिओ त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये शूट केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर शिल्पा शेट्टी कुंद्रा, दिया मिर्जा, आलिम हकीम, मृणाल ठाकुर, क्रिस गेथिन आदी अनेक कलाकारांनी कमेंट्स करत लाईक्स केले आहे.
ऋतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ सिनेमात दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा भारतातील पहिला हवेतील ऍक्शन सिनेमा असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??










