बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या खूप चर्चेत आहे. आजकाल तो अनेकदा एका सुंदर महिलेसोबत स्पॉट केला जातो आणि त्या अभिनेत्रीने आता त्याच्या घरातही हजेरी लावली आहे. याचा पुरावा म्हणजे नुकताच समोर आलेला फोटो. ज्यामध्ये ऋतिकचा खास मैत्रीण अभिनेत्याच्या कुटुंबासोबत दिसत आहे आणि हा फोटो स्वतः काका राजेश रोशन यांनी शेअर केला आहे.
सबाचा फोटो होतोय व्हायरल
ऋतिकच्या लव्ह लाईफवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ऋतिक जेव्हापासून अभिनेत्री आणि संगीतकार सबा आझादसोबत (Saba Azad) दिसला. तेव्हापासून प्रत्येकजण त्याच्या नात्याची स्थिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांनी या प्रकरणावर अद्याप मौन सोडले नाही. परंतु असे दिसते की गोष्टी वेगाने पुढे जात आहेत. खरं तर, आता सबा आझाद ऋतिक रोशनच्याच नाही, तर त्याच्या कुटुंबाच्याही जवळ दिसत आहे. रविवारीच (२० फेब्रुवारी) अभिनेत्रीने ऋतिक रोशनच्या कुटुंबासोबत जेवण केले. यादरम्यानच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.
सबा आणि ऋतिकची प्रतिक्रिया
ऋतिक रोशनने या फोटोंवर कमेंट केली आहे, “ही गोष्ट खरी आहे काका आणि तुम्ही सर्वात जास्त धमाल करता.” ऋतिकनंतर सबा आझादनेही या फोटोंवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सबा आझादने कमेंट केली आहे, “बेस्ट संडे….” चाहते ऋतिक आणि सबाच्या कमेंट्सला सतत लाईक करत आहेत आणि दोघांसाठी आशीर्वादही मागत आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर लवकरच ऋतिक रोशन ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात दिसणार आहे. काही आठवड्यांपूर्वी या चित्रपटातील ऋतिक रोशनचा फर्स्ट लूकही समोर आला होता. याशिवाय तो ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सबा आझादबद्दल सांगायचे झाले, तर तिची ‘रॉकेट बॉईज’ ही वेबसिरीज नुकतीच लाँच झाली आहे. या सीरिजमध्ये जिम सरभ आणि इश्वाक सिंग यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा :