Monday, July 1, 2024

रेखाजींच्या ‘दिल चीज क्या है’ गाण्यावर श्रीदेवीच्या लेकीचे ठुमके; व्हिडिओ भन्नाट व्हायरल

हिंदी सिनेसृष्टीत श्रीदेवी तिच्या अभिनयाप्रमाणे नृत्यासाठी ओळखली जायची. आता श्रीदेवीप्रमाणे तिची मुलगी जान्हवी कपूर हीदेखील आईच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. जान्हवी अभिनेत्रीसोबतच उत्कृष्ट डान्सरही आहे. ती कायमच तिच्या डान्स प्रॅक्टिसचे व्हिडिओ साेशल मीडियावर शेअर करते. अशातच जान्हवीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जाे प्रचंड व्हायरल हाेत आहे.

या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या ‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लीजिए’ (Dil Cheez Kya Hai, Aap Meri Jaan Lijiye) या गाण्यावर नाचताना दिसतेय. याव्यतिरिक्त जान्हवीने साेशल मीडियावर अनेक फाेटाे शेअर केले आहे. ज्यामध्ये तिच्या वेगवेगळ्या अदा पहायला मिळत आहेत. पहिल्या फाेटाेमध्ये जान्हवी ‘बॉक्सिंग गर्ल’च्या रूपात दिसतेय, तर इतर दाेन फाेटाेंमध्ये ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय. त्याचबराेबर जान्हवीची बहीण खुशीचे देखील फाेटाे दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीच्या फाेटाेवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्यात. एका चाहत्याने लिहिले की, “खुशी यामध्ये पूर्णता मुलगा दिसत आहे.” याबराेबरच इतर चाहत्यांकडून जान्हवी आणि खुशी यांच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव हाेत आहे.

जान्हवीची बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) ही झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त सुहाना खान (Suhana Khan) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) हादेखील असणार आहे.

जान्हवीच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘धडक’ या चित्रपटातून पर्दार्पण केले हाेते. या चित्रपटात जान्हवीसोबत सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) याचा भाऊ ईशान खट्टर (Ishan Khattar) देखील हाेता. हा सिनेमा सन 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या सिनेमाचा हिंदी रिमेक होता. ‘सैराट’ने तब्बल 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर महेश भटांच्या लेकीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘कधी मिळणार शिक्षा?’
दररोज पाहायचे एकमेकांचे तोंड, तरीही 3 महिने पतीशी बोलली नव्हती श्रीदेवी; कारण धक्कादायक
‘मी फक्त एवढंच सांगू शकते…’, राजूच्या तब्येतीबद्दल पत्नीने दिली महत्त्वाची अपडेट

हे देखील वाचा