अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरने (Urmila matondkar) टीव्ही रियॅलिटी शो डीआईडी सुपर मॉम्समध्ये जजची भूमीका साकारली हाेती. यावेळी या शोमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर (janhavi kapoor) पाहूणी म्हणून आली. या शोमध्ये जान्हवी कपूरसोबत असणाऱ्या नात्याबाबत ऊर्मिला बोलली. आज म्हणजेच साेमवारी (दि. 6 मार्च)राेजी जान्हवीचा 25वा वाढदिवस आहे. चला तर मग अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त उर्मिला माताेंडकर आणि जान्हवीचे खास नातं जाणून घेऊया…
खरं तर, ‘डीआयडी सुपर मॉम्स’ च्या मंचावर एका स्पर्धकाचा डान्स पाहून उर्मिला खूप आनंदी होते आणि नृत्यात तिच्या आईला साथ देणाऱ्या तिच्या मुलीचे कौतुक करते. त्याचवेळी उर्मिलाला दिवंगत अभिनेत्री आणि जान्हवी कपूरची आई श्रीदेवीची (shridevi) आठवण येते आणि ती म्हणते की, जान्हवीशी माझे खूप जुने आणि खास नाते आहे. ते नाते ती आईच्या पोटात असल्यापासून आहे.
स्पर्धकाचा डान्स पाहून उर्मिलाने सांगितले की, “जुदाई’च्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी गर्भवती होती आणि तिच्या पोटात जान्हवी कपूर होती. मात्र, श्रीदेवीमुळे त्या गाण्याचे शूटिंग व्यवस्थित पूर्ण झाले. तेव्हापासून जान्हवीशी माझे खास नाते आहे.”
विशेष म्हणजे ‘जुदाई’ (Judai)1997 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता. त्याचवेळी त्याच्या विरुद्ध श्रीदेवी आणि उर्मिला मांतोडकर दिसल्या होत्या त्यांचा हा चित्रपट सुपरहिट झाला होता. चित्रपटातील गाणी देखील खूप गाजली होती. हा लव्ह ट्रंगल सगळ्यांना खूप आवडला होता.
श्रीदेवीने 1996 मध्ये चित्रपट निर्माता बोनी कपूर (Bony kapoor) यांच्याशी लग्न केले, त्यानंतर ते दोघेही जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचे पालक झाले. त्याचवेळी 2018 मध्ये श्रीदेवीचे निधन झाले. जान्हवी कपूर देखील आता एक आघाडीचा नायिका आहे. तिने अनेक चित्रपटात काम करून लोकप्रियता मिळवली आहे.(urmila mantodkar shares a story said sridevi was pregnant with janhvi kapoor while shooting judaai 2)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षय कुमारने लेहेंगा परिधान करुन दिला लाईव्ह परफॉर्मन्स; युजर्स म्हणाले, ‘हे बघायचे बाकी…’
कुल! शाहिद कपूरचा हटके लूक, सोशल मीडियावर होतोय व्हायरल