Tuesday, May 21, 2024

‘बिग बॉस’ फेम डिम्पी गांगुली तिसऱ्यांदा झाली आई, शेअर केला नैसर्गिक प्रसूतीचा अनुभव

सध्या मनोरंजन क्षेत्रातून अनेक आनंदाच्या बातम्या येत आहेत. अशातच आता बिग बॉस फेम अभिनेत्री डिंपी गांगुलीच्या (dimpy ganguly) घरात पाळणा हालला आहे. डिंपीने तिच्या तिसर्या मुलाला जन्म दिला आहे. तिने तिचा पती रोहित रॉयसोबत फोटो शेअर करुन ही बातमी दिली आहे.

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, डिंपीने हातात एक प्ले कार्ड पकडलेले दिसत आहे. ज्यावर ‘इट्स अ बॉय’ असे लिहिले आहे. डिम्पीने २०१५ मध्ये दुबईतील बिझनेसमन रोहितसोबत दुसरे लग्न केले. दोघेही २०१६ मध्ये मुलगी रीना आणि २०२० मध्ये मुलगा आर्यनचे पालक झाले. आता त्यांचा आनंद वाढवण्यासाठी आणखी एक लहानगा आला आहे, त्याचे नाव आहे रिशान.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dimpy (@dimpy_g)

या पोस्टसोबत तिने हे देखील सांगीतले आहे की, “आम्ही हे करून दाखवले आहे. आम्ही पुर्णपणे प्राकृतिक पद्धतीने बाळाला जन्म दिला आहे. हा माझा आतापर्यंतचा सर्वात वेगळा अनुभव आहे. मला असे वाटते की, आपल्याकडे सर्वात सुंदर आपली बॉडी आहे. तुम्ही तुमच्या बॉडीवर विश्वास ठेवला आणि इज्जत दिली तर ती नक्कीच काहीतरी अद्भुत करून दाखवेल.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dimpy (@dimpy_g)

या पोस्टमध्ये डिम्पी गांगुली पुढे म्हणाली, “मी माझ्या दोन्ही मुलांना नैसर्गिकरित्या जन्म दिला आहे, परंतु मला हे अजिबात माहित नव्हते की, औषधांशिवाय मूल होऊ शकते. तुमचा निर्धार असेल तर तुम्ही काहीही करू शकता. यासाठी, मी रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी संपूर्ण प्रक्रिया नैसर्गिक ठेवली. मी माझ्या जोडीदाराचा आभारी आहे, ज्याने मला पूर्ण पाठिंबा दिला. मी तुझ्याशिवाय हे करू शकलो नसतो रोहित, आमचा मुलगा खूप गोड आहे.” अशाप्रकारे तिने इतरांचे देखील आभार मानले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार…’ तनुश्री दत्ताची भलीमोठी पोस्ट चर्चेत

‘मी विजयला अर्धनग्न पाहिलंय, आता मला पूर्ण…’, ‘या’ अभिनेत्रीचा थेट करण जोहरसमोरच मोठा खुलासा

विजय देवरकोंडा करतोय नॅशनल क्रशला डेट? सहकलाकाराचा खुलासा

हे देखील वाचा