Sunday, May 19, 2024

सचिनच्या लेकीचा शॉपिंगचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरीही म्हणाले, ‘पैशांची कमाल बाबू भैय्या’

सोशल मीडियावर नेहमीच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. अनेकदा यामध्ये दिसणाऱ्या व्यक्तींबाबत माध्यमांमध्ये चर्चा रंगल्याचे दिसते. नेटकरी तर हद्दच पार करतात. ते या व्यक्तींची तुलना थेट कलाविश्वातील लोकांशी करतात. आताही असेच काहीसे घडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यातील मुलीची तुलना थेट हॉलिवूड अभिनेत्रीशी हिच्याशी करण्यात आली आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सारा तेंडुलकर (Sara Tendulkar Video) हिचा आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी याने शेअर केला आहे. या व्हिडिओत सारा पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान करून बिल्डिंगमध्ये जाताना दिसत आहे. तिच्या हातात बॅगही दिसत आहे.

व्हायरल भयानीने व्हिडिओ शेअर करत सुंदर कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये “सारा तेंडुलकर किती सुंदर आहे,” असे लिहिले आहे. तिच्या या व्हिडिओला तासाभरातच ३० हजारांहून अधिक लाईक्स मिळले आहेत. तसेच, दोनशेहून अधिक लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. काहींना तिचा हा लूक आवडला आहे, तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एकाने कमेंट करत लिहिले की, “ती दक्षिण मुंबईच्या आँटीसारखी दिसतेय.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “पैशांची कमाल बाबू भैय्या.” आणखी एकाने लिहिले की, “सामनावीर बनल्यानंतरची शॉपिंग.” एका युजरने तिची तुलना अभिनेत्रीशी करत लिहिले की, “जेनिफर लॉरेंससारखी दिसते.” याव्यतिरिक्त अनेकजण “सुंदर”, “अमेझिंग” म्हणत तिची प्रशंसा करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

सचिन तेंडुलकरची मुलगी आहे सारा
सारा ही भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी आहे. सचिनने तिचे नाव सहारा चषक जिंकल्यानंतर ठेवले होते. सचिन याला ‘मास्टर ब्लास्टर’ या नावानेही ओळखले जाते. त्याच्या नावावर क्रिकेटमधील भरमसाठ विक्रमांची नोंद आहे. विशेष म्हणजे, सचिनच्या आयुष्यावर आधारित सिनेमाही तयार करण्यात आला आहे. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या त्या सिनेमाचे नाव ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ असे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘बिग बॉस’ फेम डिम्पी गांगुली तिसऱ्यांदा झाली आई, शेअर केला नैसर्गिक प्रसूतीचा अनुभव
‘मी विजयला अर्धनग्न पाहिलंय, आता मला पूर्ण…’, ‘या’ अभिनेत्रीचा थेट करण जोहरसमोरच मोठा खुलासा
अरेरे कसलं ते दुर्देव! ‘या’ सुपरहिट सिनेमांना लाथाडत संजू बाबाने केली मोठी चूक? ‘बाहुबली’चाही समावेश

हे देखील वाचा