Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘माझ्या वडिलांच्या जीवाला धोका, रितेश-अभिषेक मदत करा’, प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचे ट्वीट व्हायरल

‘माझ्या वडिलांच्या जीवाला धोका, रितेश-अभिषेक मदत करा’, प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचे ट्वीट व्हायरल

आपल्या वक्तव्याने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारा बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खान याच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. केआरकेच्या मुलाने ट्वीट करत आपल्या वडिलांचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले आहे. 2019मध्ये महिलेशी छेडछाड आणि वादग्रस्त ट्वीटमुळे केआरकेला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. तब्बल 9 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर केआरकेला गुरुवारी (दि. 08 सप्टेंबर) जामीन मंजूर झाला.

कमाल राशिद खान (Kamal Rashid Khan) याला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याच्या ट्वीटवरून एकापाठोपाठ एक ट्वीट करण्यात आले आहेत. हे ट्वीट त्याचा मुलगा फैसल खान (Faisal Khan) याने केले आहेत. या ट्वीटमध्ये त्याने त्याच्या वडिलांचा जीव धोक्यात असल्याचा दावा केला आहे. त्याने लिहिले की, “मी केआरकेचा मुलगा फैसल कमाल आहे. मुंबईत माझ्या वडिलांना मारण्यासाठी काही लोक कट रचत आहेत. मी 23 वर्षांचा आहे आणि लंडनमध्ये राहतो. माझ्या वडिलांना कशी मदत करावी, हे मला कळत नाही. मी अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांना माझ्या वडिलांना मदत करण्याची विनंती करतो. मी आणि माझी बहीण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही.”

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये फैसल याने लिहिले की, “आमचे वडील आमचे जीवन आहेत. मी जनतेला विनंती करतो की, त्यांनी माझ्या वडिलांना पाठिंबा द्यावा, जेणेकरून त्यांचे प्राण वाचू शकतील. त्यांना सुशांत सिंग राजपूतसारखे वागवले जावे, असे आम्हाला वाटत नाही.”

केआरकेवर वादग्रस्त ट्वीटचा गुन्हा
केआरकेला नुकताच जामीन मिळाला आहे. याची पुष्टी त्याचे वकील अशोक सरावगी यांनी केली आहे. 30 ऑगस्ट, 2022 रोजी केआरकेला मालाड पोलिसांनी अटक केली होती. असे सांगितले जात आहे की, ही कारवाई त्याच्या वादग्रस्त ट्वीटमुळे करण्यात आली होती. 2020मध्ये युवा सेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. याव्यतिरिक्त त्याच्यावर ऋषी कपूर, इरफान खान यांच्यासोबतच अनेक कलाकारांबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्याचा आरोप आहे.

केआरकेला छेडछाडीचा आरोप, मिळाला जामीन
केआरकेविरुद्ध सन 2019मध्ये एका फिटनेस ट्रेनरने छेडछाडीची तक्रार दाखल करण्यात आली होती. महिलेने असा आरोप लावला होता की, केआरकेने जबरदस्ती तिचा हात पकडला होता आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बाबो! पोटात बुक्क्या मारत राहिला व्यक्ती, सहन न झाल्याने अभिनेत्रीनं उचललं मोठं पाऊल
‘ही लज्जास्पद गोष्ट…’, पंतप्रधानांचा फोटो शेअर करत शिवसेनेच्या महिला खासदारांनी व्यक्त केला संताप; काय आहे प्रकरण
पार्वती मातेची भूमिका साकारत असताना स्टेजवरच आला मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा