‘रंग’ फेम कमल सदाना लग्नाच्या तब्बल २१ वर्षानंतर देणार पत्नी लिसा जॉनला घटस्फोट; मुलाखतीत दिली माहिती


बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोलसोबत काम केलेला अभिनेता आहे कमल सदाना. त्याने त्याची पत्नी मेकअप आर्टिस्ट लिसा जॉन हिच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गोष्टीचा खुलासा कमलने स्वतः केला आहे. त्याने सांगितले की, आम्ही दोघे घटस्फोट घेणार आहोत. कमल आणि लिसा यांनी २१ वर्षांपूर्वी लग्न केले होते. त्यांनी १ जानेवारी २००० मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. (Actor Kamal sadanah will divorce with his wife Lisa John after 21 year’s of marriage)

कमल सदनने ई-टाईम्ससोबत बोलताना सांगितले की, “दोन लोक आयुष्यात समजदार होतात आणि वेगवेगळ्या दिशेला निघून जातात. या गोष्टी प्रत्येक ठिकाणी घडत असतात आणि आम्ही त्यापैकी एक आहोत.” आता कमल आणि लिसा वेगळे राहत आहेत. कमल मुंबईला तर लिसा तिच्या आईकडे गोव्याला राहते.

कमल सदानाने काजोलसोबत ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १९९२ मध्ये आलेल्या या चित्रपटातून काजोलने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १९९३ मध्ये आलेला ‘रंग’ हा कमल सदानाचा एकदम हीट चित्रपट ठरला होता. कमलने या आधी शेवटचे ‘करकश’ या चित्रपटात सुचित्रा पिल्लईसोबत काम केले आहे. २००७मध्ये कमलने त्याच्या वडिलांचा सुपरहिट चित्रपट ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’ या चित्रपटाचा रिमेक केला. या रिमेकचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले होते. कमल सदाना हा लोकप्रिय निर्माते ब्रिज सदाना आणि अभिनेत्री सईदा खान यांचा मुलगा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.