Sunday, May 19, 2024

कपिल शर्माने साेशल मीडियावर ‘अशाप्रकारे’ उडवली खळबळ

कॉमेडियन  कपिल शर्मा हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. कपिल शर्मा स्टाईलच्या बाबतीत कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याला टक्कर देऊ शकतो. कपिल कधी त्याच्या ‘द कपिल शर्मा शो‘ शोमुळे तर कधी त्याच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत राहतो. कपिल शर्मा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून अनेकदा त्यांचे फोटो शेअर करत असताे. अलीकडेच त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर काही फाेटाे शेअर केले आहे, ज्यामुळे ताे चांगालच चर्चेत आला आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये कपिल शर्मा (actor kapil) स्विमिंग पूलजवळ उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये  कॉमेडियनच्या चाहत्यांना त्याचा फिट लूक पाहायला मिळत आहे. या फोटोत कपिलने पांढरा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि काळे शूज घातलेले दिसत आहे. कपिलच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांपासून ते इंडस्ट्रीतील त्याचे मित्र प्रचंड कमेंट करत आहेत.

कपिल शर्माच्या या फोटोवर कमेंट करताना टायगर श्रॉफने लिहिले की, “पाजी आग लगा रहे हो” तर, विंदू दारा सिंगने कमेंट करत लिहिले की, “पाजी सुपर फिट लग रहे हो.” कपिलच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करून कॉमेडियनवर कौतुकाचेही पूल बांधले आहेत. त्याचवेळी, त्याच्या एका चाहत्याने कपिलला गंमतीने विचारले की, “पाजी तुम्ही पण पोहता का? की, फक्त फोटो काढून परत जाता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

हा फोटो शेअर करताना कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जिम नाही तर पोहणे योग्य आहे… काहीही करा पण करा… सुप्रभात”. इंग्रजीत लिहिलेल्या या कॅप्शनमध्ये त्यांनी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कपिल खाली कॅप्शनमध्ये लिहितो, या वाईट कवितेबद्दल माफी मागतो पण माझा हेतू बघा.

कपिल शर्मा पत्नी गिन्नी चतरथच्या मदतीने त्याच्या लूकमध्ये  नवनवीन गोष्टी आजमावत आहे. त्याने 12 डिसेंबर 2018 रोजी जालंधरमध्ये गिन्नी चतरथसोबत लग्न केले. या जोडप्याने डिसेंबर 2019 मध्ये त्यांची मुलगी अनयरा शर्माचे स्वागत केले. कपिल आणि गिन्नी यांनी गेल्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. (actor kapil sharma shares new picture tiger shroff reacts)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री मीनाक्षी आता दिसतेय अशी, बँकरसोबत लग्न करून सोडला होता देश

मीनाक्षी शेषाद्रींनी वाढदिवसानिमित्त फोटो केला शेअर, वयाच्या 58 व्या वर्षीही दिसतात खूपच सुंदर

हे देखील वाचा