Saturday, April 20, 2024

कपिल शर्मापासून ते ऋषी कपूरपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींच्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर उडाली होती खळबळ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे आजच्या युगाचे ते शस्त्र बनले आहे. जे एखाद्याला एका रात्रीत प्रसिद्धी देऊ शकते आणि कोणाची बदनामीही करू शकते. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर हे असेच एक व्यासपीठ आहे, ज्यावर लोक मुक्तपणे आपले मत व्यक्त करतात. मात्र यामुळे अनेकवेळा आपत्तीलाही तोंड द्यावे लागते. सध्या कपिल शर्माच्या नेटफ्लिक्स स्टँड अप कॉमेडी स्पेशलवरील ट्वीटची चर्चा सर्वत्र आहे. दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थही त्याच्या ट्वीटमुळे वादात सापडला आहे. अशा परिस्थितीत आपण पुन्हा एकदा बॉलिवूड सेलिब्रिटींचे ते वादग्रस्त ट्वीट जाणून घेऊया.

कपिल शर्मा (Kapil Sharma)
कपिलने काही वर्षांपूर्वी बीएमसी मुंबईवर लाच घेतल्याचा आरोप केला होता, त्यावरून राजकीय गदारोळ झाला होता. कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक ट्वीट केले, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की बीएमसीने कार्यालय उघडण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली आहे. त्याच्या या ट्वीटमुळे राजकीय खळबळ उडाली होती.

सिद्धार्थ (Siddharth)
दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ त्याच्या ट्वीटमुळे वादात सापडला आहे. बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ट्वीट केले होते. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. सायना नेहवालच्या या ट्वीटवर अभिनेता सिद्धार्थने ट्वीट केले होते. ज्यामध्ये त्याने दुहेरी अर्थाचे शब्द वापरले आणि पुढे लिहिले की, “शेम ऑन यू रिहाना.” मात्र, वादानंतर सिद्धार्थने सायना नेहवालची माफी मागितली.

रवीना टंडन (Raveena Tandon)
वादापासून दूर राहणारी अभिनेत्री रवीना टंडनही या कोंडीत सापडली होती. २०१७ मध्ये तिने ट्वीट केले होते की, “साडी डे… सांप्रदायिक, संघी, भक्त, हिंदुत्वाचे प्रतीक म्हणणार का? जर मी म्हणाले की, मला साडी आवडते आणि मला वाटते की, ती सर्वात शोभिवंत आहे.”

सलमान खान (Salman Khan)
ट्वीटच्या वादात सलमान खानचे नाव पाहून धक्का बसेल. २०१५ मध्ये अभिनेत्याने याकुब मेननबद्दल वारंवार ट्वीट केले. मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या याकूब मेननला फाशी देऊ नये, तर त्याचा भाऊ टायगर मेनन जो मुख्य आरोपी आहे, त्याला फाशी द्यावी, असे त्याने ट्वीटमध्ये म्हटले होते. नंतर त्याने त्याचे ट्वीट डिलीट केले.

सोनू निगम (Sonu Nigam)
सोनू निगम आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा वादात सापडला आहे. सोनू निगमचे अजानबाबतचे ट्वीट सर्वाधिक चर्चेत आहे. त्याने ट्वीट करून म्हटले होते की, लाऊडस्पिकरवर पहाटेच्या पहिल्या अजानमुळे त्याची झोप खराब होते. त्याला त्याने ‘गुंडगिरी’ असेही संबोधले.

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma)
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. एकदा महिला दिनानिमित्त त्यांनी ट्वीट केले होते की, “जगातील सर्व महिलांनी सनी लिओनीप्रमाणे सर्वांना आनंद द्यावा, अशी माझी इच्छा आहे.” त्यावरून गदारोळ झाला असता त्यांनी उलटसुलट माहिती लोकांना दिली. राम गोपाल वर्मा यांनी ट्रोल करणाऱ्यांना हिप्पोक्रेट्स म्हटले होते. मात्र, नंतर त्यांनी ट्वीट करून माफीही मागितली.

अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya)
गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी सोशल मीडियावर अनेकदा दुखावणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले. अशाच एका ट्वीटमध्ये त्यांनी करण जोहर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, “आणखी एक #लवजिहाद…मेहबूबा #करणजोहर डिप्रेशनमध्ये आहे…पाकप्रेमी फवादने गरीब श्रीमती करण जोहरचा विश्वासघात केला.”

परेश रावल (Paresh Rawal)
‘बाबुराव’ पडद्यावर भरपूर कॉमेडी करतो, पण खऱ्या आयुष्यात परेश रावल यांचे राजकीय विषयांवर स्पष्ट मत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल ट्वीट केले होते, “आमचा चाय-वाला टूर बारवालापेक्षा कधीही चांगला असू शकत नाही!” एका मीमला उत्तर देताना त्यांनी हे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये पीएम मोदींसाठी चहावाला आणि सोनिया गांधींसाठी बारवाला वापरण्यात आला होता. या वादानंतर परेश रावल यांनी माफीनामाही लिहिला आहे.

ऋतिक रोशन (Hrithik Roshan)
होय, या यादीत ऋतिक रोशनचेही नाव आहे. या अभिनेत्याचे नाव कंगना रणौतसोबत जोडले जात होते. दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी नाराजी व्यक्त करत ऋतिकने लिहिले की, “मीडिया ज्या महिलेचे नाव घेत आहे, त्यापेक्षा माझे पोपसोबत अफेअर असण्याची शक्यता जास्त आहे. धन्यवाद.” पोपचे नाव मध्यभागी आणणे ऋतिकला महागात पडले.

ऋषी कपूर (Rishi Kapoor)
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी एकदा नव्हे तर अनेकवेळा वादग्रस्त ट्वीट केले आहेत. त्यांनी गोमांस, दारूची दुकाने उघडणे, मास्क इत्यादींवर बोल्ड ट्वीट केले आहेत. गोमांसबाबत त्यांनी ट्वीट केले होते, “मला खूप राग आला आहे. अन्नाला धर्माशी का जोडता? मी गोमांस खाणारा हिंदू आहे. मग यावरून मी गोमांस न खाणार्‍या माणसाइतकेच देवाला घाबरतो हे सिद्ध होते का? विचार करा.” यामुळे ते वादात सापडले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा