Saturday, June 15, 2024

श्रद्धाच्या गाण्यावर शक्ती कपूरने मारला ‘ठुमका’, युजर म्हणाले, ‘नंदू सर्वांचा बंधू’

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर लवकरच ‘तू झुठी मैं मक्कर‘ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मंगळवारी (दि. 21 फेब्रुवारी)ला या चित्रपटाचे ‘शो मी द ठुमका‘ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले, जे प्रेक्षकांना खूप आवडले. अशात आता सर्वजण या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत श्रद्धा कपूरचे वडील म्हणजेच अभिनेता शक्ती कपूर कसे मागे राहतील? त्यांचाही एक धमाकेदार व्हिडिओ अभिनेत्रीने पाेस्ट केला आहे, जाे साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

श्रद्धा कपूर (shraddha kapoor) हिने तिच्या इंस्टाग्रामवर वडिल शक्ती कपूरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता मुलीच्या गाण्यावर मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये श्रद्धा म्हणते, “बापू ठुमका लावत आहे?” यावर अभिनेता म्हणतो, “ठुमका लावला जात नाही, मारला जातो.”  मग अभिनेत्रीही आनंदाने ओरडते आणि म्हणते, “मारो ठुमका.” ही क्लिप शेअर करताना, श्रद्धाने लिहिले, “हॅशटॅग मारो ठुमका, जाे चांगला ठुमका मारेल, त्याला मी स्टाेरीवर ठेवेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. टायगर श्रॉफने कमेंट करत लिहिले, ‘दिग्गज’, तर एकाने लिहिले, ‘हे बापू ज्या पद्धतीने सांगत आहेत, ते खूप गोंडस आहे.’ अशातच अभिनेत्रीचा भाऊ सिद्धांत कपूरने लिहिले, ‘अरे देवा.. सर्वोत्तम व्हिडिओ’, तर एका चाहत्याने लिहिले, ‘नंदु सर्वांचा बंधू.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

‘तू झुठी मैं मकर’मध्ये रणबीर कपूरसोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि आयशा रझा मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तू झुठी मैं मक्कर मधून स्टँड-अप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे देखील पदार्पण करणार आहेत.(bollywood actor shakti kapoor dance on daughter shraddha kapoor song show me the thumka)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

यामी गौतमला आपली नक्कल करताना पाहून पंगा क्वीन म्हणाली, “भेटल्यावर तू…”

हे देखील वाचा