अभिनेता कार्तिक आर्यनची पोस्ट चर्चेत, सर्वांसाठी केली देवाकडे प्रार्थना; म्हणाला…

Actor kartik Aaryan praying for everyone and hoping for better tomorrow


देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. रुग्णांची संख्या देखील खूप वाढत आहे. त्यामुळे सरकारने अनेक कडक निर्बंध लावले आहेत. कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. अनेक कलाकार देखील मदत करत आहे. अनेकजण कोरोना रुग्णांसाठी सोयी सुविधांचा पुरवठा करत आहेत, तर काहीजण मानसिक आधार देत आहेत. यातच बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने संपूर्ण जनतेला सलाम केला आहे. यासाठी कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

कार्तिक आर्यनने शुक्रवारी (7 मे) त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो अमृतसर मधील सुवर्णमंदिरामध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की,”या कठीण प्रसंगात माझा माणुसकी वरचा विश्वास आणखीनच दृढ झाला आहे. हे ऐकून खूप आनंद होतो की, कशाप्रकारे सगळे पुढे येऊन मदत करत आहे. मग ते सोशल मीडियावर दयाभाव, आपुलकी दाखवणे असो किंवा गरजूंना मदत करणे असो. मी या सगळ्यांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.”

मार्चमध्ये कार्तिक आर्यन याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याने या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर दिली होती. कोरोना निगेटिव्ह आल्यावर त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले होते की, “निगेटिव्ह, 14 दिवसाचा वनवास संपवून पुन्हा एकदा कामावर आलो आहे.”

कार्तिक आर्यन नुकताच करण जोहरच्या ‘दोस्तांना 2’ या चित्रपटातून बाहेर होण्याच्या बातमीमुळे चर्चेत आला होता. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘भुल भुलैया 2’ या चित्रपटात कियारा आडवाणी आणि तब्बू सोबत दिसणार आहे. तसेच तो ‘धमाका’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र

-काय आहे प्रियांकाच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे गुपीत? वाचून तुम्हीही कराल स्वतःमध्ये बदल


Leave A Reply

Your email address will not be published.