Tuesday, June 16, 2026
Home बॉलीवूड लखनौमधील शाळेत चित्रित झालेला ‘गदर’चा सीन आजही प्रेक्षकांच्या आहे लक्षात

लखनौमधील शाळेत चित्रित झालेला ‘गदर’चा सीन आजही प्रेक्षकांच्या आहे लक्षात

बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय आणि अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक म्हणजे गदर आहे. या चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आजही प्रेक्षक या चित्रपटाला विसरु शकले नाहित. तसेच सोशल मिडीयावर ‘गदर’मधील दृश्ये आज सोशल मीडियावर ‘मीम्स’च्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसतात. पण तुम्हला माहित आहे का.. सनी देओलने हँडपंप उपटून काढल्याचे ते प्रसिद्ध दृश्य प्रत्यक्षात लखनौमधील एका कॉलेजमध्ये चित्रित केले होते. आणि हे ठीकाण पाहण्यासाठी लोक तिथे जात असत.

चित्रपटातील त्या दृश्यामुळे वाटु शकते हे दृश्य पाकिस्थात चित्रत केले आहे का मात्र हँडपंपचे ते दृश्य पाकिस्तानात नाही, तर उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात चित्रित करण्यात आले होते. जागा लखनौमधील प्रसिद्ध ‘ला मार्टिनियर कॉलेज’  आहे.  तर ही माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एका मुलाखाती दरम्यान सांगितली आहे. आणि त्यानी पुढे म्हणले की ‘गदर’ आणि ‘गदर 2’ प्रमाणेच ते ‘गदर 3’ चे चित्रीकरणही लखनौमध्येच करण्याची योजना आखत आहेत. त्यांनी तर असेही म्हटले की, लखनौशिवाय ‘गदर’ (gadar)चित्रपट शक्य झाला नसता.

‘गदर’मध्ये सनी देओलसोबत अमीषा पटेलने मुख्य भूमिका साकारली होती. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या आकडेवारीनुसार, 19 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 133 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘गदर’ या सुपरहीट चित्रपटाचा पुढचा भाग 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर 691 कोटी रुपयांची कमाई केली आणि तो देखील सुपरहीट ठरला.

हेही वाचा

प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘29’, नेटफ्लिक्सवर 11 दिवसांपासून कायम आहे ट्रेंडिंगवर

हे देखील वाचा