सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड सिनेमांना मोठ्या प्रमाणात बॉयकॉट केले जात आहे. त्यामुळे बॉयकॉट ट्रेंड हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खान याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमापासून या ट्रेंडने जोर पकडला होता. आता या ट्रेंडच्या भोवऱ्यात हळूहळू अनेक सिनेमे सापडत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक सिनेमे या ट्रेंडच्या भोवऱ्यात सापडलेत. अशातच आता सिनेमे लागोपाठ फ्लॉप होण्यावर अभिनेता कार्तिक आर्यन याने मोठे वक्तव्य केले आहे.
यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैय्या 2’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या सिनेमानंतर कदाचितच असा सिनेमा असेल, ज्यासाठी चित्रपटगृहात समाधानकारक गर्दी पाहायला मिळाली असेल. अशात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याने एका मुलाखतीत स्टारकिड्स आणि इनसायडर्सवर निशाणा साधला.
‘माझे करिअर संपेल’
माध्यमांशी बोलताना अभिनेता म्हणाला की, “या चित्रपटसृष्टीत मला कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. माझी दृष्टी वेगळी होती. माझ्या पहिल्या दोन चित्रपटांदरम्यान मला हे चांगलेच समजले. मात्र, चाहत्यांनी मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम दिले आहे. त्यामुळे माझे चित्रपट हिट ठरले. माझा एकही चित्रपट फ्लॉप झाला, तर लोक नक्कीच माझ्याबद्दल असे म्हणायला लागले असते की, आता माझे चित्रपट चालणार नाहीत, माझे करिअर संपेल.”
View this post on Instagram
नाकारली होती 9 कोटींची ऑफर
विशेष म्हणजे, नुकतीच पान मसाल्याच्या ब्रँडची जाहिरीत नाकारल्यामुळे कार्तिक आर्यन चांगलाच चर्चेत आला होता. त्याने तब्बल 9 कोटी रुपयांची ऑफर नाकारली होती. त्यामुळे त्याची सर्वत्र वाहवा झाली होती.
आगामी सिनेमे
अभिनेता कार्तिक आर्यन याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘भूल भुलैय्या 2’ या सिनेमानंतर ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा आडवाणी दिसणार आहे. याव्यतिरिक्त त्याच्या खात्यात ‘कॅप्टन इंडिया’, ‘फ्रेडी’ आणि ‘शहजादा’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कपिल शर्मानंतर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटात दीपिकाची एंट्री, लूक पाहून चाहते फिदा
‘द काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच साधला निशाणा; म्हणाले…
कोणी चित्रकार तर कोणी बुद्धिबळपटू, बॉलिवूड कलाकार खेळांमध्येही आहेत आघाडीवर