Saturday, February 22, 2025
Home कॅलेंडर दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आहेत ज्यांनी त्यांच्या स्टाईलने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अशातच अगदी कमी कालावधीत ज्याने मुलींच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे, तो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन होय. त्याने बऱ्याच रोमँटिक चित्रपटात काम केले आहे. कार्तिक आर्यन सोमवारी (२२ नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे, चला तर जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी..

कार्तिक आर्यनचा जन्म २२ नोव्हेंबर १९९० मध्ये झाला. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल जरी आपल्याला माहीत असले, तरी त्याचे वैयक्तिक आयुष्य मात्र चांगलेच चर्चेत होते. त्याची लव्ह लाईफ खूपच रंगतदार होती. याचा खुलासा स्वतः कार्तिकने केला होता. त्याची पहिली गर्लफ्रेंड तेव्हा होती, जेव्हा तो इयत्ता दहावीत होता. (Actor kartik Aryan celebrate his birthday, let’s know about his life)

कार्तिक आर्यनने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. ज्यावेळी तो त्याचा चित्रपट ‘लव्ह आजकल’चे प्रमोशन करण्यासाठी आला होता. त्याने सांगितले होते की, १० वी मध्ये त्याची एक जवळची मैत्रीण होती. जिला तो ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी हॉटेलमध्ये भेटायला जात असत. परंतु त्यावेळी तो खूप घाबरत होता की, कोणी त्याला बघणार तर नाही ना?

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेता असलेल्या कार्तिकने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्याने ‘डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ मधून शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने मॉडेलिंग देखील केली आहे. यानंतर त्याची भेट कास्टिंग दिग्दर्शक राहुल गुरूमित सिंगसोबत झाली होती. राहुल गुरूमित सिंग त्याला एका चित्रपट निर्मात्याला भेटवले. तिथूनच त्याचे आयुष्य बदलले.

त्याने ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर त्याची लोकप्रियता सर्वत्र पसरली. नेटफ्लिक्सवर देखील त्याचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तो लवकरच ‘भूल भूलैया’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बज्मीने केले आहे. या चित्रपटातून त्याचा एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा

हे देखील वाचा