भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि आम्रपाली दुबे ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही जोडी एक चित्रपट घेऊन आली आहे. त्यांच्या चित्रपटाचे नाव ‘आशिकी’ आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळत आहे. ‘आशिकी’ चित्रपट हा जातीवादीची बंधने तोडताना दिसणार आहे. भोजपुरी चित्रपटाचे चाहते या चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशामध्ये या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ट्रेलरमध्ये असे दाखवले आहे की, खेसारीला अभिनेत्रीसोबत प्रेम होते. हा ट्रेलर ४:४४ मिनिटांचा आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला खेसारी आणि आम्रपालीचा रोमान्स आणि एक गाणे दाखवले आहे. नंतर दोघांच्या प्रेमामध्ये जातीची भिंत येते. अभिनेत्याला उच्च जातीचा दाखवला गेला आहे. अभिनेत्री आम्रपाली ही खालच्या जातीची असल्यामुळे तिच्या घरचे त्यांचे नाते स्वीकारत नाहीत. त्यानंतर अभिनेता प्रेमापोटी घरच्यांना सोडून जातो. चित्रपटात अनेक चांगले सीन दाखवले आहेत. चाहत्यांना त्यांचा रोमान्स खूप आवडत आहे.
रविवारी (२४) एन्टर १० रंगीला या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेला हा ट्रेलर राडा करत आहे. या ट्रेलरला आतापर्यंत ११ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.
तसेच या चित्रपटात त्याला शंकर देवाचे भक्त दाखवले आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांमधील उत्साह आणखी वाढला आहे. तसेच चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट देखील पाहत आहेत. या दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.
‘आशिकी’ चित्रपटाचे दिग्दर्शन पराग पाटील यांनी केले आहे. या चित्रपटात खेसारी आणि आम्रपाली यांच्याशिवाय कुणाल सिंग, प्रकाश जैश आणि श्रुती राव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील गाणीही चाहत्यांना खूपच भावली आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर खेसारी या चित्रपटाशिवाय ‘डोली सजा के रखना’, ‘सबका बाप अंगूठा छाप’ आणि ‘विधाता’ यांसारख्या चित्रपटातही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘रसोडे में कौन था’वर आधारित तयार झालेल्या ‘या’ भोजपुरी गाण्याने इंटरनेटवर केला धमाका
-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?
-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार