[rank_math_breadcrumb]

‘माझ्यावर आभाळ कोसळलं होतं’; त्या घटनेने दुखावलेल्या किरण मानेची पोस्ट आली चर्चेत

अनेक नाटक, मालिका तसेच चित्रपटामध्ये काम करून अभिनेता किरण माने हा सध्या यशाच्या शिखरावर आहे. किरण माने (Kiran Mane) हा मराठी टेलिव्हिजनचा एक लोकप्रिय चेहरा आहे. था ए अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे. माझ्या नवऱ्याची बायको, पिंपळपान, सिंधुताई सपकाळ, तीतळी, मुलगी झाली हो यांसारख्या मालिकांमध्ये काम करून त्याने प्रसिद्धी मिळवलेली आहे. परंतु मुलगी झाली या मालिकेमध्ये तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होताम तसेच या मालिकेतून त्याला काढण्यात देखील आले होते. या घटनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याने किरण मानेने या निमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली आहे.

ही पोस्ट शेअर करून किरण माने म्हणतात की; “…आज बरोब्बर तीन वर्ष झाली ! माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. कुठलीही चूक नसताना मला सिरियलमधून काढून टाकलं होतं. त्यावेळी मी मोठ्या आत्मविश्वासानं ही पोस्ट केली होती.ट्रोल्सनी थयथयाट केला होता, ‘किरण माने संपला’ , ‘रस्त्यावर आला’, ‘आता त्याला कोण काम देणार?’, ‘आमच्याशी पंगा घेणाऱ्यांना आम्ही असेच संपवू’ अशी गरळ ओकली होती. त्यावेळी तुम्ही भावाबहिणींनी मला भरभरून सपोर्ट केलावता.”

…आज मला तुम्ही ‘सर आँखो पे’ ठेवलं आहे. या तीन वर्षात मी करीयरमधलं सगळ्यात जास्त काम केलं ! तीन सिरियल्स, बिगबॉस, सात सिनेमे… महाराष्ट्रभर शिवशाहूफुलेआंबेडकर आणि बुद्धविचारांचा प्रसार… एवढंच नाही तर राजकीय मंचही गाजवला. हे सगळं अजूनही नॉन स्टॉप सुरू आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बिगबॉस मधून आल्यावर साताऱ्यात माझी भव्य मिरवणूक निघाली होती.

आजच्याच दिवशी ज्या वेळी मला सिरीयलमधून काढून टाकल्याचा फोन आला होता, त्याच टायमिंगला म्हणजे बरोब्बर ७.३० वाजता आज माझं फ्लाइट आहे. एका मोठ्या कंपनीच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी मी ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून चाललो आहे !

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

तीन वर्षांत मी करियरचा आनंदसोहळा साजरा करतोय.
तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतायच… पन त्यावेळी मला विरोध करणारेसुद्धा अनेकजण माझे फॅन झालेत. कौतुकाची, मायेची बरसात करतायत ! परवाच पुण्यातल्या एक लेखिका आशा नेगी भेटल्या… म्हणाल्या, “तीन वर्षांपूर्वी जेव्हा तुमच्यावर आरोप होत होते, तेव्हा माझे तुमच्याविषयी वाईट मत झाले होते. या तीन वर्षातला तुमचा प्रवास पाहून, तुमचे विचार वाचून, भाषणं ऐकून मी तुमची डाय हार्ड फॅन झाले आहे.” माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं…मला काळजापासून जीव लावणाऱ्या लाखो भावाबहिणींचे लै आभार.

मी तुमच्या घरातलं एक लेकरू हाय. तुकोबारायांच्या “बोले तैसा चाले” या वचनावर विश्वास ठेवून वाटचाल करतोय. मराठमोळा अभिनेता म्हनून तुम्हाला कायम अभिमान वाटेल असंच काम माझ्या हातनं होत राहील, हे वचन देतो. लब्यू”

किरण मानेच्या या पोस्टवर त्याचे चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. किरण मानेने बिग बॉस मराठी 4 मध्ये भाग घेतला होता आणि त्यानंतरच तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

श्रुती मराठेचा डॅशिंग लूक; कर्ली हेअर स्टाईलने वेधले सगळ्यांचे लक्ष
या दिवशी सुरु होणार धूम ४ ची शूटिंग; असा असेल रणबीर कपूरचा खास लूक…