Thursday, June 13, 2024

“…त्या दिवसापासून दारू अशी सुटली” अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील विवादित अभिनेता म्हणून किरण माने यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकरल्या आहेत. मालिका आणि चित्रपटामध्ये काम करताना ते दिसून येतात. त्यांनी स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत काम केले आहे. त्या मालिकेत काम करताना त्यांचे कलाकारांशी वाद झाले. त्यामुळे त्यांना मालिकेतून अचानक काढण्यात आले. त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. आता बऱ्याच दिवसांनी किरण यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते अनेकदा फोटो शेअर करतात. इतकच नाही तर किरण माने त्यांच्या आयुष्यातील किस्से देखील शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांना दारूचे व्यसन कसे लागले आणि ते कसे सोडले याबद्दल सांगितले आहे. ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

किरण माने यांची ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. त्याचवेळी किरण माने यांनी या पोस्टनंतर आलेला अनुभव शेअर केला आहे. त्यांनी पोस्ट रिपोस्ट केली आहे. त्याचवेळी त्यांनी लिहीले की, “दोन वर्षांपूर्वी ही पोस्ट वाचून अनेक फोन्स मला आले होते. ते म्हणाले की, सर मी ही अभिनेता आहे. दारूमुळे माझा संसार,करीयर सगळं उध्वस्त झालंय. एकेकाळी अभिनयाची अनेक पारितोषिकं घेतलीत. तुमची पोस्ट वाचली. मला तुमच्यासारखंच व्यसनमुक्त व्हायचंय. काय करू???” एक रत्नागिरीचा आणि एक इचलकरंजीचा असे दोघेजण व्यसनमुक्त झालेही ! वरचेवर नवनविन फाॅलोअर्सनी ही पोस्ट वाचावी यासाठी #रिपोस्ट करत रहाणं गरजेचं वाटतं मला.”

किरण माने यांच्या या पोस्टवर खूप साऱ्या कमेंट येत आहेत. एका युजरने लिहीले की, “दारू वाईट आहे मित्रा, बरं झालं सोडलीस”. दुसऱ्याने लिहीसले की, “अंगावर काटा व डोऴ्यात पाणी आलं. असेच मनाला भिडणारं लिहता रहा. अस्सल माणूस वाटताय. यातून अनेकांना प्रेरणा मिळेल.” (Actor Kiran Mane’s post on social media is viral)

अधिक वाचा-
अभिनेत्री राखी सावंतच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री; म्हणाली,‘मी माझ्या आयुष्यात पुन्हा…’
सुनीता आहुजाने फेटाळली होती गोविंदासोबत चित्रपट करण्याची ऑफर, कारण जाणून व्हाल लोटपोट । Sunita Ahuja Birthday

 

हे देखील वाचा