Tuesday, April 23, 2024

सुनीता आहुजाने फेटाळली होती गोविंदासोबत चित्रपट करण्याची ऑफर, कारण जाणून व्हाल लोटपोट । Sunita Ahuja Birthday

चित्रपट अभिनेता गोविंदा (Govinda) केवळ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता नाही, तर त्याची पत्नी सुनीता आहुजा देखील कमी लोकप्रिय नाही. गोविंदा जेवढा रिजर्व आणि पाठ पूजन करणारी व्यक्ती आहे, तर सुनीताही तितकीच मस्त आणि मस्ती करणारी आहे. अनेक शो आणि मुलाखतींमधून सुनीताचा बिनधास्तपणा समोर आला आहे. ती बोलते तेव्हा मन मोकळे पणाने बोलते. कुठलाही प्रश्नाचे उत्तर ती एवढ्या बिनधास्तपणे देते की, ती समोरचा शांत होतो.

अलीकडेच, सुनीता आणि गोविंदाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती उघडपणे सांगत आहे की, तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा का नव्हती. सुनीताला चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नाहीत, असे नाही. तिला गोविंदासोबत चित्रपट करण्याची संधी मिळाली, पण तिने नकार दिला. पण सुनीताच्या नकारामागील कारण तुम्हाला हसायला भाग पाडेल. (sunita ahuja reject movie offer with govinda know the reason)

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. सुगंधा मिश्रा आणि कृष्णा अभिषेक यांनी होस्ट केलेल्या शोचा हा व्हिडिओ आहे. व्हिडीओमध्ये सुगंधा सुनीताला विचारते, “जर हिरो नंबर 1 या घरातून बाहेर पडला असेल, तर हिरोईन नंबर 1ही या घरातून बाहेर पडेल आणि तुम्ही थेट कॅमेऱ्यासमोर आलात, असं कधी झालं आहे का? यावर सुनीता म्हणते, “इतकी मेहनत कोणी करेल?”

सुनीताचे उत्तर ऐकून कृष्णा आणि गोविंदा हसायला लागतात. यानंतर सुनीता म्हणते, “हिरो कमावतो, मग उडवा. मेहनत कशाला करायची?” यानंतर कृष्णा अभिषेक विचारतो, “पण तुम्हाला हिरोईनच्या ऑफर आल्या असतील?” यावर सुनिता म्हणते की, “अनेक ऑफर्स आल्या. पहिल्या चित्रपटाची ऑफर आली, पण एवढी मेहनत कोणी करायची. इथे मेकअप करायलाच जीव जातो.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकरी यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

अधिक वाचा –
– सुशांतच्या पुण्यतिथीला रिया चक्रवर्ती झाली भावुक, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत म्हणाली…
– प्राजक्ता माळीने राज ठाकरेंसाठी लिहीली भन्नाट पोस्ट; म्हणाली, ‘तुमच्या आयुष्यातील..’

हे देखील वाचा