Sunday, April 14, 2024

अभिनेत्री राखी सावंतच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री; म्हणाली,‘मी माझ्या आयुष्यात पुन्हा…’

मनाला वाटेल ते बोलणारी आणि वागणारी अभिनेत्री तसेच आयटम गर्ल म्हणजे राखी सावंत होय. सतत काही ना काही करण्याची इच्छा असणारी राखी ही सतत बेधडक वक्तव्याने चर्चेत राहिली आहे. ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्धी झोतात असलेली अभिनेत्रा राखी सध्या सतत आपल्या वैक्तीक आयुष्यामुळे लोकांचे लक्ष वेधत आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

राखी (Rakhi Sawant) सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अनेक छोट्या मोठ्या गोष्टी सांगत असते. राखी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मागील काही दिवसांपुर्वी राखी तिच्या अफेअर्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आदिल खान दुर्रानीसोबतच्या तिच्या नात्याचं काय झालं हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. त्यामुळे ती फार चर्चेत आली होती. दरनम्यान आता राखीच्या आयुष्यात नविन व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. याबद्दल तिने खुलासा केला आहे.

राखी सावंत म्हणाली की,”मी नुकतीच एका व्यक्ती भेटली आहे. ती खूप छान व्यक्ती आहे. पण माझ मन अजून तयार नाही आणि मला खूप भीती वाटत आहे. माझ्या पहिल्या लग्नाच काय झाले, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे मला समजत नाही मी काय करु. सध्या मी एकटीच आहे. त्यामुळे मला नवीन जीवनसाथीची गरज आहे.”

पुढे बोलताना राखी म्हणाली की,”आदिलने मला दुबईला बोलावले होते. त्याने मला मदत मागीतली. पण त्यावेळी मी त्याला स्पष्ट नकार दिला. आता मी माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येण्याची वाट पाहत आहे. आयुष्यात मी खूप रडले आहे. मी डिप्रेशनमध्ये गेली होते म्हणून मी दुबईला निघून आले.”

जेव्हा पापाराझींनी तिला त्या खास व्यक्तीबद्दल विचारले तेव्हा राखी सांगितले की, ती लवकरच त्याच्याबद्दल माहिती देईल. तुम्हाला दुखावणारी खूप लोक असतात. त्यातील काही लोक तुमच्या दु:खावर मीठ चोळत असतात. तर काही लोक मलम लावत असता. पण अशा लोकांना जवळ ठेवले पाहिजे. (Actress Rakhi Sawant opened up about love)

अधिक वाचा-
सुनीता आहुजाने फेटाळली होती गोविंदासोबत चित्रपट करण्याची ऑफर, कारण जाणून व्हाल लोटपोट । Sunita Ahuja Birthday
काय सांगता! गोविंदाच्या सासूनेच वाचले होते त्याचे प्रेमपत्र, अशी होती गोविंदा आणि सुनीताची प्रेमकहाणी । Sunita Ahuja Birthday

हे देखील वाचा