Thursday, June 12, 2025
Home मराठी ‘पांडू’ चित्रपटात भाऊ अन् कुशलसोबत सोनाली कुलकर्णीचा ठसका, ‘या’ गाण्यात दिसणार महाराष्ट्राची अप्सरा

‘पांडू’ चित्रपटात भाऊ अन् कुशलसोबत सोनाली कुलकर्णीचा ठसका, ‘या’ गाण्यात दिसणार महाराष्ट्राची अप्सरा

विनोद हा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचा भाग आहे. विनोदाशिवाय कोणताही प्रयोग सहसा यशस्वी होत नाही. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अस्सल हाडाचे विनोदी कलाकार होऊन गेले. ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर समस्त प्रेक्षक वर्गाला हास्याच्या महासागरात नेऊन सोडले होते. आजही त्यांचे चित्रपट पाहताना कधी कंटाळा येत नाही. यातील एक आघाडीचे नाव म्हणजे दिवंगत अभिनेते दादा कोंडके होय. त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीने सगळ्यांना खळखळून हसवले आहे. या महान अभिनेत्याच्या स्मरणार्थ मराठीमध्ये लवकरच एक नवीन चित्रपट येणार आहे. जो विनोदवीराची गाथा सांगणार आहे.

‘पांडू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची धमाल जोडी दिसणार आहे. या चित्रपटाचे सध्या प्रमोशन जोरदार चालू आहे. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार आहे. कुशल बद्रिके याने सोशल मीडियावर ‘पांडू’ चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर करून सोनालीची झलक दाखवली आहे. ‘केळीवाली’ हे या गाण्याचे नाव आहे. यात सोनाली आणि भाऊ कदम डान्स करताना दिसत आहे. (Actor kushal badrike share pandu movies song trailar on social media)

हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “उद्या पाहा, ठसकेबाज केळेवालीचा दिलखेचक अंदाज. भेटूया ३ डिसेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.” हे संपूर्ण गाणे सोमवारी (२२ नोव्हेंबर) रोजी प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातील सोनाली कुलकर्णीच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्यांच्या या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विजू माने हे आहेत. तसेच या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते यांनी गायली आहेत. चित्रपटाचा प्रोमो पाहून तर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच चित्रपटात नक्की काय असणार आहे, हे आपल्याला ३ डिसेंबरला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा

हे देखील वाचा