मराठी मनोरंजनविश्वातील मोठे आणि प्रसिद्ध नाव म्हणजे दिग्दर्शक संजय जाधव. उत्तम मालिकांपासून ते ब्लॉकबस्टर चित्रपटांपर्यंत त्यांनी अनेक संस्मरणीय कलाकृती तयार केल्या. संजय जाधव म्हणजे मराठी इंडस्ट्रीमधील यशस्वी दिग्दर्शक. एक हुशार दिग्दर्शक असण्यासोबतच चांगला अभिनेता म्हणून देखील त्याला ओळखले जाते. असा हा संजय जाधव आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना इंडस्ट्रीसोबतच त्यांच्या फॅन्सच्या देखील शुभेच्छा मिळत आहे. मात्र या सर्वांमध्ये अभिनेता कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या पोस्टबद्दल खूपच चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
कुशलने त्याच्या इंस्टाग्रामवर संजयसोबतचा एक फोटो शेअर करत अतिशय हटके पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्यात लिहिले, “तशी आपली ओळख फार जुनी म्हणजे “साडे माडे तीन” पासूनची पण मैत्री कधीपासूनची? हे काही मला नीटसं सांगता येणार नाही.
“गंगुबाई नॉन मॅट्रिक” फिल्मच्या सेटवर फ्रेम रिकामी दिसते ! म्हणून मला वापरलंस तिथली,
का मग “रावरंभाच्या” हॉटेल मधली पहाटेच्या 5:30 ची ब्लॅककॉफी वाली मैत्री आपली,
का मग “हवा येऊ द्या” च्या सेटवर मी संजू दादा बनून येतो आणि तुझ्यासारखा “सारे विश्वची माझे घर” असल्यासारखा वावरतो तेव्हाची,
का मग आत्ता आत्ता लंडनच्या बस मध्ये तुझ्या Spartas सोबत झालेल्या प्रवासातली मैत्री.
दादा तुला ना माणसांना आपलंसं करून घ्यायचं व्यसन आहे.
एवढी “दुनियादारी” बघितलेला माणूस तू ,आयुष्याने “चेकमेट” केलं तरी “फक्त लढ म्हणणारा” असा “गुरु” तूच. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत तुझी एक “प्यार वाली लव स्टोरी” आहे आणि प्रत्येकाच्या यशात तुझा “खारी बिस्किटाचा” तरी वाटा आहेच.
आज तुझ्या वाढदिवशी तुझ्या “कलावतीला” लोकांच्या मनापर्यंत जायला “डोंबिवली फास्ट” ट्रेन मिळू दे, आणि box office वर “धुडघूस”घालूदेत हाच देवाकडे “जोगवा” मागतो.
Happy birthday दादा खूप खूप शुभेच्छा आणि तुला मनापासून प्रेम.
तुझ्यासारख्या माणसांना वय नसतं हेच खरं……..”
कुशलच्या या पोस्टवर खुद्द संजय जाधवने देखील “माझ्याकडे शब्दच नाहीये…कमाल लिहिले आहेस…खूप प्रेम” अशी कमेंट केली आहे. दरम्यान संजय सोबतच कुशलच्या आणि संजयच्या फॅन्सने देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय जाधव इंडस्ट्रीमधील मोठे त्रस्थ आहे. त्याने ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’, खारी बिस्कीट, प्यारवाली लव्हस्टोरी’ आदी अनेक कलाकृतींची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच त्याच्या ब्लॉकबस्टर अशा ‘दुनियादारी’ सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाले.
अधिक वाचा-
प्रियांकावर आली होती तिच्या बॉयफ्रेंडला कपाटात लपवण्याची वेळ, जाणून घ्या काय होतं कारण?