मॉडेल, अभिनेत्री, निर्माती, गायिका आणि आता लेखिका इतक्या सर्व क्षेत्रात काम करून नावलौकिक मिळवणारी आणि ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सर्वांचीच आवडती आहे. प्रियांका नेहमीच तिच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. बरेलीसारख्या छोट्या शहरातून आलेल्या प्रियंकाने तिच्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील तिच्या नावाचा डंका वाजवला.
हॉलिवूड अभिनेता आणि गायक निक जोनाससोबत लग्न करून प्रियंका आता भारताबाहेर राहत असली, तरी ती अजूनही तिच्या देशात आणि बॉलिवूडमध्ये तितकीच रमते. प्रियंकाने तिच्या बालपणापासून ते आतापर्यंतचा तिचा प्रवास आणि अनेक आठवणी पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर आणल्या आहेत. तिचे नुकतेच ‘मेमोयर अनफिनिश्ड’ नावाचे एक पुस्तक प्रदर्शित झाले आहे. या पुस्तकातील अनेक गोष्टींमुळे प्रियंका सध्या खूप चर्चेत आली आहे. या पुस्तकात तिने तिच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. यातीलच एका मजेशीर किस्स्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
प्रियांकाने तिच्या शालेय जीवनातील काही काळ अमेरिकेत तिच्या मावशीकडे घालवला होता. मावशीकडे असताना ती १० मध्ये शिकत होती. ती शाळेत असताना तिला तिच्या क्लासमधला बॉब नावाचा एक मुलगा आवडायला लागला होता. त्याचे वागणे, बोलणे पाहून ती खूप इंप्रेस झाली होती. त्या दोघांनी तर लग्न करण्याचे सुद्धा ठरवून टाकले होते.
एकदा तिने घरात तिची मावशी नसताना बॉबला टीव्ही पाहायला बोलावले होते. ते टीव्ही बघत असताना अचानक तिची मावशी घरी आली, ते पाहून प्रियांका खूप गोंधळली, आणि तिने बॉबला तिच्या रूममधल्या कपाटात लपवले. तिची मावशी घरात आल्यावर तिला संशय आला आणि तिने शोधा शोध करायला सुरुवात केली, तेव्हा तिला कपाटात लपलेला बॉब सापडला. त्याला पाहून मावशी खूप चिडली आणि तिने प्रियांकाच्या आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच प्रियांकाला पुन्हा भारतात परतावे लागले होते.
अधिक वाचा-
–सलमानच्या नावे फेक कॉल्स… भाईजानने दिला ‘हा’ थेट इशारा; वाचा काय घडले?
–दीपा चौधरी हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा