Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड तब्बल २०० कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ‘मद्रास कॅफे’ फेम लीना मारिया पॉलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तब्बल २०० कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ‘मद्रास कॅफे’ फेम लीना मारिया पॉलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसांनी ठग सुकेश चंद्रशेखरची पत्नी लीना मारिया पॉलला अटक केली आहे. तिहार जेेलमध्ये सुरू असलेल्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी रॅकेटमध्ये मारियाचा सहभाग असल्याचा संशय आहे. बँक फसवणुकीच्या प्रकरणात लीनाच्या सहभागासंदर्भात २०२० मध्ये, तिच्या विरोधात लुक कोर्टाचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मद्रास कॅफे चित्रपटात काम केलेल्या लीनावर, अनेक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये तिच्या पतीला मदत केल्याचा आरोप आहे.

कॉनमॅन आहे तिहार तुरुंगात
लीनाचा पती सुकेशही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या आठवड्यात, ईडीने चंद्रशेखरच्या तामिळनाडूतील बंगल्यावर छापा टाकला आणि अनेक मौल्यवान वस्तू जप्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडे फेरागामो, चॅनेल, डायर, लुई व्हिटन सारख्या विदेशी ब्रँडचे शूज, बॅग आणि कपडे होते. तसेच त्याचे घर देखील लक्झरी फर्निचर, कलाकृती, मूर्ती आणि झुंबरांनी भरलेले होते.

छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी रोल्स रॉयस घोस्ट, बेंटले बेंटायगा, फेरारी ४५८ इटालिया, लॅम्बोर्गिनी उरुस यासारख्या १६ लक्झरी कारही जप्त केल्या. आरोपी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत होता. त्याने लोकांना लक्ष्य करून २०० कोटी रुपये गोळा केले.

यापूर्वीही करण्यात आली होती अटक
लीना मारिया पॉलला २०१३ मध्ये चंद्रशेखरसह चेन्नई बँकेत १९ कोटी रुपयांच्या फसवणुकीमध्ये अटक करण्यात आली होती. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात तिला २०१५ मध्ये पुन्हा अटक करण्यात आली. डिसेंबर २०१८ मध्ये पॉल कोची येथील ब्युटी पार्लरमध्ये शूटआऊट केल्यानंतर पुन्हा चर्चेत आली होती. इतर २१ प्रकरणांमध्ये आरोपी चंद्रशेखर आणि लीना मारिया पॉल फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये सामील आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा