Tuesday, June 25, 2024

अफलातून! महेश बाबूच्या लाडक्या लेकीने लावले इंग्रजी गाण्यावर ठुमके, पाहून तुम्हीही कराल प्रशंसा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवलेला अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) आपल्या चित्रपटांसाठी नेहमीच नावाजला जातो. त्याचे दमदार डायलॉग्ज, ऍक्शन्स आणि रोमँटिक अंदाजही भाव खाऊन जातो. त्याच्या या प्रत्येक अंदाजाचे कोट्यावधी चाहते आहेत. विशेष म्हणजे, महेशच नाही, तर त्याची पत्नी नम्रता शिरोडकरही (Namrata Shirodkar) एकेकाळी बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. तसेच, ती मिस इंडियाही राहिली आहे. मात्र, आता त्यांच्या मुलीने आपल्या डान्सने सोशल मीडियावर धमाल केली आहे. तिचा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

नुकतेच महेश आणि नम्रताची मुलगी सिताराने (Sitara Ghattamaneni) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती इंग्रजी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओतील तिच्या डान्स मूव्हजवर प्रेक्षकही फिदा झाले असून जो तो तिची प्रशंसा करत आहे. (Actor Mahesh Babu Daughter Sitara Dance To DJ Snake Taki Taki Song)

नम्रतानेही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सिताराचा धमाकेदार डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर हजारो प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये सितारा डीजे स्नेकच्या ‘ताकी ताकी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यातील तिचे मूव्हज अगदी पाहण्यासारखे आहेत. या मूळ गाण्यात सुपरस्टार सेलेना गोमेझ डान्स करताना दिसली होती. मात्र, सितारानेही या गाण्यावर झक्कास एक्सप्रेशन्स दिले आहेत.

नम्रताने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ९ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ९५ हजारांपेक्षाही अधिक लाईक्सचाही पाऊस पडला आहे.

सिताराचे इंस्टाग्रामवर SitaraGhattamaneni या नावाने अकाऊंटही आहे. यावर ती नेहमी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. सिताराने ‘ताकी ताकी’ गाण्यावरील आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या डान्स शिक्षकासोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाकांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सिताराचे डान्स कौशल्य पाहून हे स्पष्ट होते की, ती आपल्या पालकांच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. तसेच, ती मोठी होऊन मोठ्या पडद्यावर कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करेल. महेश बाबू अजूनही अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दुसरीकडे नम्रता या क्षेत्रातून दूर झाली आहे. मात्र, असे असले, तरीही ती आपल्या मुलीला प्रत्येक गोष्टीत पारंगत करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘डॅड स्टॉप इट यार!’, एनसीबीच्या ऑफिसबाहेर वडिलांचे वागणे पाहून वैतागला आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट

-एकदम कडक! ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रीमिअरला लावली ‘या’ अभिनेत्रीने हजेरी, सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा

-अभिनेत्री प्राची सिंगने केला नवीन व्हिडिओ शेअर, गाण्यातून व्यक्त केले कृष्णप्रेम

हे देखील वाचा