Monday, June 24, 2024

अभिनेत्री प्राची सिंगने केला नवीन व्हिडिओ शेअर, गाण्यातून व्यक्त केले कृष्णप्रेम

भोजपुरी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अदाकारीने चाहत्यांच्या हृदयात घर केले आहे. विशेष म्हणजे, यापैकी अनेक अभिनेत्री या अशा आहेत, ज्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. यामध्ये समावेश होतो तो म्हणजे अभिनेत्री प्राची सिंगचा. प्राची सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अशातच आता तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ राधा राणीची नगरी बरसाना येथील आहे.

या व्हिडिओमध्ये प्राची (Prachi Singh) गोपीच्या वेशभूषेत दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा लेहंगा आणि मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे. या ड्रेससोबत तिने लाल रंगाची चुनरीही घेतली आहे. व्हिडिओत ती आपल्या जवळच्या मित्रासोबत म्हणजेच कृष्णासोबत थिरकताना दिसत आहे. यासोबतच आपल्या जवळच्या मित्रासाठी तिने बॅकग्राऊंड म्युझिकमार्फत आपले प्रेमही व्यक्त केले आहे. (Actress Prachi Singh Expressed Her Love For Shri Krishna From The Film Song At Radha Rani Temple Barsana)

प्राचीच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

जवळच्या व्यक्तीबद्दल बोलल्यामुळे, आता तुम्ही असा विचार करत असाल की, प्राची बरसाना येथील परिसराच्या आवारात एकटीच नाचताना दिसत आहे, तिच्यासोबत इतर कोणीही नाही. खरं तर, प्राची श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाला आपला सर्वात जवळचा मित्र मानते. या व्हिडिओमध्येही प्राची कृष्णाच्या मूर्तीसोबत नाचताना दिसत आहे. ती दररोज कृष्णासोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. प्राची जेव्हा देशाबाहेर जाते, तेव्हाही ती कृष्णाला सोबत घेऊन जाते.

प्राची सिंग कृष्णाशिवाय कुठेही जात नाही. ती प्रत्येक ठिकाणी कृष्णाला आपल्या कुशीत बसवून यात्रेला जाते. व्हिडिओत तिने स्वाती मेहूलच्या ‘ये तूने क्या किया’ गाण्यामार्फत कृष्णाबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी अभिनेत्रा बरसाना आणि वृंदावनच्या यात्रेवर गेली होती. आता ती कामातून फ्री होऊन पुन्हा श्रीकृष्ण नगरी पोहोचली आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच प्राची इंदिरा गांधी विमानतळावर कृष्णासोबत दिसली होती. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, प्राची देवाची किती मोठी भक्त आहे, जी एक क्षणही त्याच्याविना दूर राहत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

-लाल बिकिनी घालून बीचवर ‘Chill’ करताना दिसली दिशा पटानी, बोल्ड फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

-जेव्हा सुंदर ड्रेस अचानक खिसकला खाली, भर इव्हेंटमध्ये ‘Oops Moment’ची शिकार झाली मलायका अरोरा

हे देखील वाचा