Monday, June 24, 2024

एकदम कडक! ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रीमिअरला लावली ‘या’ अभिनेत्रीने हजेरी, सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा

बॉलिवूड ‘भाईजान’ म्हणजेच अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) एका चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्या चित्रपटात सलमान खानने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तो चित्रपट इतर कोणता नसून ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ आहे. ‘अंतिम’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एक दिवसाआधीच या चित्रपटाचे प्रीमिअर ठेवण्यात आले होते. दरम्यान अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, या सर्वांमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते ६१ वर्षीय अभिनेत्री संगीता बिजलानीने (Sangeeta Bijlani). तिच्या रूपावर चाहते अक्षरश: फिदाच झाले. ती या वयातही सौंदर्यवतींना टक्कर देताना दिसत आहे.

संगीताचा कहर
सलमान खानच्या आयुष्यात काहीतरी घडतंय आणि संगीता त्याचा भाग नाही, असं कधीच होत नाही. संगीता नेहमीच सलमान आणि त्याच्या कुटुंबासोबत उभी असते. आता पुन्हा एकदा ती सलमान आणि आयुष शर्माच्या ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रीमिअरमध्ये दिसली. यावेळी तिला पाहून सर्वजण दंग झाले. अभिनेत्रीने यादरम्यान काळ्या रंगाचा डीप नेक टॉप परिधान केला होता. त्याच्या जोडीला शिमरी मिनी स्कर्टही होता. (Actor Salman Khan Ex Girlfriend Sangeeta Bijlani Mini Skirt Is The Buzz of Town)

स्टाईलचे होतेय प्रशंसा
संगीता सलमान खानची मैत्रीण आहे आणि ती नेहमीच कार्यक्रमांमध्ये दिसते. ‘अंतिम’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगच्या खास क्षणी संगीताच्या फिटनेस आणि तिचा ग्लॅमरस अवताराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीच्या स्टाईल आणि तिच्या फिटनेसबद्दल सोशल मीडियावर खूप कौतुकही होत आहे.

क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत केले होते लग्न
संगीता बिजलानीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर तिने दिग्गज माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी लग्न केले होते. त्यानंतर त्यांचा सन २०१० मध्ये घटस्फोट झाला होता. एक काळ असा होता, जेव्हा संगीता सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, दोघांचे ब्रेकअप झाले.

संगीता बिजलानीने ‘त्रिदेव’, ‘हातीम ताई’, ‘योद्धा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पारदर्शी ब्रालेट आणि लांब कोट घातलेल्या नेहा कक्करचा पॅरिसच्या रस्त्यांवर दिसला कातिलाना अंदाज

-‘तुझे अक्सा बीच घूमा दूं’ गाण्यावर अनुपमा आणि अनुजने रस्त्यावर केला धमाकेदार डान्स

-‘अंतिम’च्या स्क्रिनिंगमध्ये रंगली दिशा पटानीच्याच लूकची चर्चा, युजर्स म्हणाले, ‘सर्जरी केली का?’

हे देखील वाचा