तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. केवळ देशातच नाही, तर अगदी परदेशातही त्यानो त्याच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा महेश बाबू हा त्याच्या खऱ्या आयुष्यातही एखाद्या हीरोपेक्षा कमी नाहीये. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गरिबांना मदत करून तो त्यांचा हीरो बनला आहे. नुकतेच त्याने एका गरीब मुलाच्या हृदयावर सर्जरी करून त्याला जीवनदान दिले आहे.
महेश बाबू एका चॅरिटीमार्फत हृदय विकाराने पीडित असणाऱ्या लहान मुलांची सर्जरी करून त्यांना मदत करतो. या गोष्टीची माहिती त्याची पत्नी नम्रता शिरोडकर हिने दिली आहे. नुकताच तिने भार्गव नावाच्या एका मुलाच्या सर्जरीबाबत माहिती देताना त्याच्या आई वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. नम्रताने असे लिहले आहे की, “अजुन एक खुश करणारी बातमी. हे जाणून खूप आनंद झालाय की, वीएसडी आणि पीडीएकडून अंकित भार्गवची सर्जरी झाली आहे आणि त्याला डिस्चार्ज देखील मिळाला आहे. या मुलाच्या आरोग्यासाठी मी नेहमीच प्रार्थना करेल.”
महेश बाबूने आंध्रा हॉस्पिटल आणि हिल्लिंग लिटिल हार्ट संस्थेसोबत 2019 पासून काम करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये त्याने आजपर्यंत 1000 पेक्षाही जास्त मुलांची सर्जरी करण्यास मदत केली आहे. त्याच्या या कामामुळे त्याचे चाहते खूपच कौतुक करत आहेत.
याव्यतिरिक्त महेश बाबूने 2016 मध्ये आंध्रप्रदेशातील बुरिपलेम हे गाव दत्तक घेतले होते. त्याने या गावाचा खूपच विकास केला आहे. तेथील सगळे रहिवाशी त्याला देवमाणूस मानतात.
महेश बाबूच्या चित्रपटसृष्टीतील कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘सरकारू वैरीपाटा’ या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. तसेच त्याचा ‘मेजर 2’ हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सैफच्या दुसऱ्या लग्नाला लावली होती साराने हजेरी, पहिल्या बायकोने स्वत: केले होते तयार