सैफच्या दुसऱ्या लग्नाला लावली होती साराने हजेरी, पहिल्या बायकोने स्वत: केले होते तयार

Saif Ali Khan's daughter attend his secound wedding


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने त्याच्या आयुष्यात दोन लग्न केली आहेत. त्याने सन 1991 मध्ये आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी लग्न केले होते. अमृता त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी होती. त्या दोघांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव सारा अली खान आणि मुलाचे नाव इब्राहिम असे आहे.

काही दिवसांनंतर त्यांच्यातील वाद वाढू लागले होते आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सन 2004 मध्ये त्या दोघांनी कायदेशीर प्रक्रियेने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर त्यांच्या दोन्ही मुलांची जबाबदारी अमृता सिंगने घेतली.

त्यानंतर करीना कपूर आणि सैफच्या अनेक बातम्या इंडस्ट्रीमध्ये पसरायला लागल्या. ते दोघे बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते. अखेर सन 2012 मध्ये त्या दोघांनी लग्न केले. परंतु अमृता सिंगने तेव्हा त्या दोघांच्या नात्याचा खूपच समंजसपणे स्वीकार केला होता. एवढंच काय तर तिने तिच्या मुलीला सैफच्या लग्नाला जाण्यासाठी स्वतःच्या हाताने तयार केले होते.

अमृताने डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्याकडून खूप सुंदर लेहंगा आपल्या मुलीला घालण्यासाठी खरेदी केला होता. सारा अली खान आणि करीना कपूर यांच्यामधे खूप चांगली बॉडिंग दिसून येते.

एका मुलाखतीमध्ये साराने सांगितले होते की, “करीना कपूर माझ्याशी अगदी एका मैत्रिणीसारखी वागते. आम्हा दोघींचे नाते अगदी स्पष्ट आहे, यात काहीही शंका नाही.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पटौदी घराण्याचा छोटा नवाब पुन्हा एकदा चर्चेत, गोंडस फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

-कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.