अभिमानास्पद! महानायक अमिताभ बच्चन यांना मिळणार आंतरराष्ट्रीय पुरस्कार; प्रसिद्ध दिग्दर्शक करणार सन्मानित

Big B Amitabh Bachchan Will Be Awarded The 2021 Fiaf Felicitated By Martin Scorsese And Christopher Nolan


चित्रपटसृष्टीत कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम अभिनयासाठी नेहमीच पुरस्कारांनी गौरवण्यात येते. त्यातीलच एक म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन. बिग बींच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. त्यांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

येत्या १९ मार्चला होणाऱ्या व्हर्च्युअल कार्यक्रमात बिग बींना ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्ह (एफआयएएफ)’ यांच्याद्वारे प्रतिष्ठित २०२१ एफआयएएफ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. बिग बींना त्यांच्या चित्रपटाच्या संग्रहणासाठी हा पुुरस्कार हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन आणि मार्टिन स्कोर्से सन्मानित करणार आहेत.

या पुरस्काराबाबत बिग बींनी म्हटले की, ‘२०२१ सालचा एफआयएएफ पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप सन्मान वाटत आहे, ज्यासाठी मी मनापासून वचनबद्ध आहे. चित्रपट संकलन हे चित्रपट निर्मितीइतकेच आवश्यक आहे, या कल्पनेस आम्ही दृढ केले पाहिजे. मला आशा आहे की आम्ही या अत्यंत आवश्यक कारणासाठी चित्रपट उद्योगात आणि सरकारमधील आमच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळवण्यास सक्षम आहोत. ज्यामुळे आपल्याला गौरवशाली चित्रपट वारसा जपण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी केंद्र बनवण्याचे स्वप्न साकार करता येईल.

वयाच्या ७८ व्या वर्षी बिग बींना एफआयएएफ संलग्न फिल्म हेरिटेज फाउंडेशनने नामांकन दिले होते. जे चित्रपट निर्माते आणि अभिलेखागार शिवेंद्र सिंग डूंगरपूर यांनी स्थापन केलेल्या ना-नफा संस्थेच्या जतन, जीर्णोद्धार, दस्तऐवजीकरण, प्रदर्शन आणि भारतीय चित्रपटाच्या वारसा अभ्यासासाठी समर्पित आहे.

त्यांनी म्हटले की, ‘आमचे ब्रँड एँबेसेडर अमिताभ बच्चन यांचे सतत समर्थन मिळाल्याचे भाग्य आहे. त्यांनी आमचा चित्रपट वारसा जतन करण्यासाठी नेहमीच पाठिंबा दर्शविला आहे.

बिग बींनी सांगितली ‘झुंड’ चित्रपटाची रिलीझ डेट
कोरोना व्हायरसमुळे बिग बींच्या ‘झुंड’ चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलली आहे. परंतु आता चित्रपटाची अंतिम रिलीझ डेट चाहत्यांसमोर जाहीर केली आहे. बिग बींनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत याची रिलीझ डेटही सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपट १८ जून रोजी रिलीझ होणार आहे.

त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, “कोव्हिडने आपल्याला अनेक धक्के दिले आहेत. परंतु आता पुनरागमन करण्याची वेळ आली आहे. आपण त्या दिवसांमध्ये परतलो आहोत. ‘झुंड’ १८ जून २०२१ रोजी चित्रपटगृहात रिलीझ होत आहे!”

बिग बींच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर यावर्षी त्यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत. त्यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट ३० एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीझ होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत इमरान हाशमी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ११ मार्च रोजी या चित्रपटाचा टिझर रिलीझ होणार आहे. याव्यतिरिक्त बिग बी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातही झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पटौदी घराण्याचा छोटा नवाब पुन्हा एकदा चर्चेत, गोंडस फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

-कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.